सायली रोगे हिला विद्यापीठस्तरीय सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका पुरस्कार जाहीर

HomeNewsनागपुर डिवीजन

सायली रोगे हिला विद्यापीठस्तरीय सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका पुरस्कार जाहीर

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा (ता.प्र) :-– श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकाची स्वयंसेविका कु. सायली दशरथ रोगे हिला गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली राष्ट्रीय सेवा योजना तर्फे देण्यात येणारा २०२५-२६ चा विद्यापीठस्तरीय सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक गटातील पुरस्कार जाहीर झाला आहे. सायली ने तिच्या स्वयंसेवक काळात युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार, राज्य शासनाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्यापीठातर्फे आयोजित विद्यापीठस्तरीय, राज्यस्तरीय शिबिर आणि राष्ट्रीय शिबिरात सहभागी होत महाविद्यालयाचे नावलौकिक केले.
सायलीने राष्ट्रीय एकात्मता शिबिर, (चंदीगड विद्यापीठ चंदीगड), राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धा उत्कर्ष मधे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर), राज्यस्तरीय साहसी शिबिर, (चिखलदरा), राज्यस्तरीय इंद्रधनुष्य-२०२५ (कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव) सोबतच भारतीय विद्यापीठ संघटनेचा (AIU) ३९ वा आंतरविद्यापीठ मध्यवर्ती विभागीय युवा महोत्सव छत्रपती संभाजीनगर या अशा विविध शिबिरांमध्ये महाविद्यालय व विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत नावलौकिक केले. तसेच महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात सहभागी होत श्रमदान आणि विविध जनजागृती उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेच्या मी नाही तर तू या ब्रीदवाक्यला जपत स्वयंसेवक चा कालावधी पूर्ण केला, या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक कार्याची दखल घेत गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाने संपूर्ण विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना महाविद्यालयातून प्रस्ताव मागवून त्यामधून सायली ची विद्यापीठस्तरीय सर्वोत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून निवड केली आणि हा पुरस्कार जाहीर केला.
या पुरस्कारासाठी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा चे संपूर्ण संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम. वारकड, उपप्राचार्य डॉ आर आर खेरानी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बल्की, महाविद्यालयातील संपूर्ण प्राध्यापकवृंद, तथा शिक्षकेत्तर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे स्वयंसेवक यांच्या तर्फे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

You cannot copy content of this page