– दिव्यांगांच्या बोगस प्रमाणपत्राच्या तपासणीसह अन्य 9 मागण्या मंजूर
– मागण्या मंजूर झाल्याने निश्चिल येनोरकर यांनी भंडारा शहरात ढोल वाद्यासहित काढली विजयी रॅली
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे
भंडारा: दिव्यांग बोगस प्रमाणपत्रां मधील कथित गैरप्रकारांची चौकशी करून विशेष वैद्यकीय मंडळामार्फत फेरतपासणी करावी, या प्रमुख मागणीसाठी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे भंडारा जिल्हाध्यक्ष निश्चिल येनोरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, आंबेडकर चौक भंडारा येथे १४ सप्टेंबरपासून बेमुदत अन्न-पाणी त्याग आंदोलन सुरू होते. अखेर 23 सप्टेंबरला आमरण उपोषणाची दखल घेऊन तहसीलदाराच्या लेखी आश्वासनानंतर आमरण उपोषण मागे घेण्यात आले .

मीडिया अधिकार मंच भारताचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संजीव भांबोरे यांनी २३ सप्टेंबर रोजी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांची परिस्थिती जाणून घेतली. यावेळी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याचे सांगण्यात आले. अन्न-पाण्याचा त्याग करून आंदोलन सुरू असताना आरोग्याची परिस्थिती गंभीर होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीला धोका निर्माण झाल्यास प्रशासनाने त्याची गांभीर्याने जबाबदारी स्वीकारून आवश्यक वैद्यकीय उपाययोजना करावी, अशीही मागणी करण्यात आली होती. याकरिता पत्रकार संजीव भांबोरे, पत्रकार धम्मपाल मेश्राम, पत्रकार सदानंद धारगावे, पत्रकार सय्यद जाफरी यांनी याकरिता मीडियाच्या माध्यमातून प्रश्न लावून धरला होता. मागण्यांची पूर्तता करण्यात आली.

त्या खालीलप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील दिव्यांग प्रमाणपत्रांची जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली विशेष वैद्यकीय मंडळ स्थापन करून फेरतपासणी करण्यात यावी, कर्मचाऱ्यांनी आर्थिक देवाणघेवाण करून
फेरतपासणीमध्ये एखादे दिव्यांग प्रमाणपत्र नियमबाह्य किंवा बनावट असल्याचे अधिकृतरीत्या सिद्ध झाल्यास संबंधितांवर शासनाच्या नियमानुसार कठोर कारवाई करावी, कथितरीत्या घेतलेल्या शासकीय लाभांची नियमानुसार वसुली करावी आणि फसवणूक अथवा गैरवापर सिद्ध झाल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, फेरतपासणीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडावी, संपूर्ण कागदपत्रांची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी अशा मागण्यांची अशा मागण्या करण्यात आल्या होत्या. आज दिनांक 24 सप्टेंबर 2026 ला जिल्हाधिकारी सावन कुमार व भंडारा शहरातील पोलीस निरीक्षक भुसारी यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व मागण्या मंजूर झाल्यामुळे वाद्य सहित भंडारा शहरातून विजय रॅली करण्यात आली.

