रिओलीफीन पॉली प्लास्ट प्रायव्हेट कंपनीला पागोरा ग्रामवासियांच्या विरोध

HomeNewsनागपुर डिवीजन

रिओलीफीन पॉली प्लास्ट प्रायव्हेट कंपनीला पागोरा ग्रामवासियांच्या विरोध

निमगाव गट ग्रामपंचायत ने ग्रामसभेत ठराव न घेता मासिक ठरावानेच दिली मंजुरी
प्रदूषणाचा विद्यार्थी ,नागरिक व महिलांवर होणार विपरीत परिणाम
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे
भंडारा-
भंडारा तालुक्यातील निमगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पागोरा गावालगत निमगाव ग्रामपंचायत ने ग्रामसभेत ठराव न घेता मासिक सभेत ठराव घेऊन रिओलीफीन पॉली प्लास्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला काम सुरू करण्याबाबत एनओसी दिलेली आहे. पागोरा गावातील लोकसंख्या जवळपास 600 आहे. बाजूलाच अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, त्याचप्रमाणे नागरिकांचे निवासी स्थान आहे. त्यामुळे या कंपनीपासून नागरिकांचे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन अनेक समस्यांना त्यांना समोर तोंड द्यावे लागणारा आहे .त्यामुळे कंपनीचे काम तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी आज दिनांक 18 सप्टेंबर 2026 ला सर्व महिला व पुरुषांनी गाव बंद करून सामूहिकरीत्या पत्रकार परिषद आयोजित करून त्या परिषदेच्या माध्यमातून एका रॅलीचे आयोजन करून तात्काळ कंपनी बंद करण्याचे मागणी करण्यात आली. यावेळी गावातील संपूर्ण महिला व पुरुष प्रामुख्याने उपस्थित होते. सदर मागणी मंजूर न केल्यास भंडारा ते पवनी रस्त्यावर आंदोलन करण्याचे त्याचप्रमाणे निमगाव येथील ग्रामपंचायत ताला ठोका आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी अड्याळ पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त होता.

You cannot copy content of this page