लक्कडकोट शाळेतील शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार

HomeNewsनागपुर डिवीजन

लक्कडकोट शाळेतील शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्थेचा पुढाकार.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि. १३ ऑगस्
ट जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, लक्कडकोट येथील शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आज जाहीर सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे कौतुक करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणाऱ्या इयत्ता चौथीतील रोहित अरुण राऊत्रे, मानसी मारुती गेडाम, आचल गणेश मोहुर्ले तसेच इयत्ता सातवीतील कु. महिमा रमेश रामेला या चार विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व चॉकलेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून भविष्यातही अशीच उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सत्कार सोहळ्यात नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे शीला दिलीप जाधव, दिलीप जाधव, रवी दुर्गे, मंगला रामटेके, चंदा तावडे आणि दीक्षा रामटेके यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचा उत्साह वाढविला.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, लक्कडकोटचे मुख्याध्यापक जनार्धन पत्रूजी मेश्राम, सहायक शिक्षिका अनुराधा अनंत डोंगे, विषय शिक्षक विष्णू शंकर जाधव, सहायक शिक्षक जब्बार मैनोद्दीन शेख, सहायक शिक्षिका तृप्ती मधुकरराव निंभोरकर तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. शिष्यवृत्ती परीक्षेसारख्या स्पर्धात्मक परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे त्यांच्या मेहनतीसोबतच शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन यांचे फलित असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे लक्कडकोट शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

    You cannot copy content of this page