आज इरई येथून गेले दोन बकरे चोरीला

HomeNewsनागपुर डिवीजन

आज इरई येथून गेले दोन बकरे चोरीला

गौतम नगरी चौफेर निखिल पिदूरकर //कोपरणा :- येथील श्री गणपत दसरू आत्राम मु. इरई पो. भोयगाव ता. कोपरणा जि.चंद्रपूर येथील रहिवाशी असून त्याच गेल्या अनेक वर्ष्या पासून मुख्य व्यवसाय हा बकऱ्या असून ते नेहमी प्रमाणे दिनांक :-29/07/2026 रोज बुधवार ला बकऱ्या चाराला गेले आणि सायकाळी 5 वाजता घरी आले आणि सगळ्या बकऱ्या नेहमी प्रमाणे गोठ्यात बाधल्या आणि दिनांक :-30/07/2026 रोज गुरुवार ला बारक्या बाहेर काढल्या असता तिथे दोन बकरे नाही असे समजल्यास शेजारी इकडे तिकडे चौकशी केली असता बकरे कुठे दिसून आले नाही तर गोठ्यात पाहिले असतात तिथे बकरे बाधलेल्या दोरी सुद्धा दिसली नसून त्याना वाटलं कि आपले बकरे चोरीला गेले आहे तर त्यानी गडचांदूर पोलीस स्टेशनं इथे जाऊन अज्ञात व्यक्ती विषय अर्ज देऊन चौकशी करण्याची मागणी केली

बकऱ्याचे वर्णन.
1) काळा कलर चा असून 3 वर्ष 6 महिण्याचा होता त्याला सिघे नाही त्याच्या उजव्या कानाच्या खाली मोठी जखम होऊन आहे त्याची अंदाजे किंमत 25000 हजार आहे
2) काळ धामण 2 वर्ष्या 6 महिन्याचा होता त्याला 4 inch सिंग असून पोटावर लाल कलरच्या थोडया रेशा आहे त्याची किंमत 17000 हजार आहे

मी एक सामान्य घरचा व्यक्ती असून माझा व माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह हा बरक्या वर असून माझी आर्थिक मोठी नुकसान झाली आहे तरी सदर प्रकरणात चौकशी करण्यात यावी या विषय गडचांदूर पोलीस स्टेशन येथील लेखी स्वरूपात अर्ज दिला आता त्याच्या चौकशी कडे माझे लक्ष आहे.

श्री. गणपत दसरू आत्राम मालक

You cannot copy content of this page