– नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे पुरस्कार वितरीत.
– बबलू चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्याने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा १६ मार्च –
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा जिल्हा चंद्रपूर च्या वतीने नुकतेच “सेवाव्रती सन्मान” हा गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयनगुडा तालुका भामरागड येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयनगुडा येथील मुख्याध्यापक विनीत बंडू पद्मावार यांना शैक्षणिक कार्यातील भरीव व उल्लेखनीय कामगिरी बद्दल तर कल्पना नारायण उईके, परिचारिका, आरोग्य उपकेंद्र विसामुंडी यांना आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल मानवतेच्या कल्याणासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल शॉल, स्नेहचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना बबलू चव्हाण, महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्याने शैक्षणिक साहित्य व बिस्कीट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुकेश सातपुते, जेष्ठ कंत्राटदार यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, सुनैना तांबेकर, नागपूर विभाग महिला अध्यक्षा, अरुणा बुटले, पुष्पा मेश्राम राजुरा तालुका महीला संघटिका, श्रीरंग ढोबळे, राजुरा शहर उपाध्यक्ष, मंदा सातपुते, रवी बुटले, महाराष्ट्र राज्य युवा उपाध्यक्ष, सचिन मोरे, सुभाष पिंपळकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
——————————————–
विनीत बंडू पद्मावार, मुख्याध्यापक, जि.प. प्राथ. कोयनगुडा तालुका भामरागड
विद्यार्थ्यांच्या प्रगतीकरिता सातत्याने नवोपक्रम राबवून लोकसहभाग मिळविला. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात पहिल्याच स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवित तीन लाखांचे बक्षीस मिळाले. वाढत्या जबाबदारीनुसार विद्यार्थी – पालक यांचा समन्वय साधून लोकप्रतिनिधी, समाजसेवी संस्था आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सहकार्य केले व आज शाळेची पटसंख्या वाढ होऊन अनेक सोयी सुविधा उपलब्ध झाल्या असून स्थानिक कला,कौशल्य आणि साहित्याचा वापर करून मी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करीत आहे. माझा हा सन्मान मी विद्यार्थ्यांना अर्पण करतो असे प्रतिपादन मुख्याध्यापक विनीत पद्मावार यांनी केले.
——————————————–
कल्पना नारायण उईके, परिचारिका आरोग्य उपकेंद्र विसामुंडी
आरोग्य क्षेत्रातील माझे कार्य मी प्रामाणिकपणे करीत असून अनेक विपरीत परिस्थिती असताना व अडचणीमधून मार्ग काढून आरोग्य सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे असे समजून मी कार्य करीत आहे. माझा सन्मान माझ्या कार्याला अधिक बळ देणारा आणि मला कर्तव्याची जाणीव करून देणारा ठरेल असे प्रतिपादन कल्पना नारायण उईके यांनी केले.
——————————————–


COMMENTS