कर्जमाफीसाठी राज्यस्तरावर उच्चाधिकार समिती गठित

HomeNewsनागपुर डिवीजन

कर्जमाफीसाठी राज्यस्तरावर उच्चाधिकार समिती गठित

थकीत शेतकऱ्यांनी माहिती पुरविण्याचे गजानन पाथोडे यांचे आवाहन
गौतम नगरी चौफेर (गौतम धोटे) : शासनस्तरावर सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे शासन निर्णय ३० ऑक्टोबर २०२५ नुसार शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या उद्देशाने राज्यस्तरावर उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आली आहे.

सेवा सहकारी संस्था, आदिवासी विकास संस्था स्तरावर शेतकऱ्यांची कागदपत्रे माहिती संकलित केली जात आहे. पोर्टलवर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत थकीत कर्जदार थकीत शेतकऱ्यांनी त्वरित माहिती पुरविण्याचे आवाहन जिल्हा शेतकऱ्यांच्या कर्जखात्याची परिशिष्ट अ मध्ये माहिती अपलोड करण्याचे काम सुरू आहे. यासाठी मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गजानन पाथोडे यांनी केले आहे. जिल्ह्यातील संस्था, बँकेचे थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, अॅग्रिस्टेक आयडी उपलब्ध होतं नसल्याने सदर पोर्टलवर परिपूर्ण माहिती भरण्यास अडचण निर्माण होत आहे. सदर माहिती थकीत कर्जदार शेतकऱ्यांनी संस्था गटसचिवांकडे त्वरित उपलब्ध करून द्यावी. तसेच मयत झालेल्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांचे वारसांनी वारसा नोंद करून संबंधित कागदपत्रे संस्थेकडे सादर करावी. ज्या शेतकरी सभासदांचे बँक खाते नाहीत. त्यांनी बँक खाते उघडून घ्यावे. आपली वैयक्तिक माहिती जसे अद्यावत आधार कार्डची झेरॉक्स, मोबाइल क्रमांक, अॅग्रिस्टक फार्मर आयडीची झेरॉक्स त्वरित संस्थेचे गटसचिव यांच्याकडे प्रत्यक्ष लवकरात लवकर जमा करावे, असे आवाहन गजानन पाथोडे यांनी केले आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page