जैवविविधतेचे संवर्धन हीच काळाची गरज!

HomeNewsनागपुर डिवीजन

जैवविविधतेचे संवर्धन हीच काळाची गरज!

— मंगेश गिरडकर, उपविभागीय वन अधिकारी, राजुरा- आदर्श शाळेत वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा.

वृक्षदिंडी, चित्रकला, निबंध स्पर्धा, सायकल रॅली काढून दिला वन्यप्राणी संरक्षणाचा संदेश.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा,
दि.६ ऑक्टोबर वन्यजीवांचे संरक्षण,जैवविविधतेचे संवर्धन आणि मानव-वन्यजीव संघर्षाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने वन्यजीव सप्ताह–२०२६ निमित्त आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल, राजुरा येथे भव्य चित्रकला स्पर्धा व वन्यजीव सप्ताह जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी ६ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर, राजुराच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे होत्या. कार्यक्रमाला मंगेश गिरडकर, उपविभागीय वन अधिकारी, राजुरा हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून गजानन इंगळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, राजुरा उपस्थित होते. यावेळी एस. जी. गरमडे, क्षेत्र सहाय्यक, राजुरा, पी. आर. मत्ते, क्षेत्र सहाय्यक, टेंबुरवाही, सुनील मेश्राम, वनपाल, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र राजुरा, नरेंद्र देशकर, वनपाल, सामाजिक वनीकरण वनसडी, ताकसांडे, वनरक्षक, सिंधी , पवन मंडूरवार यांच्यासह वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी, वनपाल, वनरक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून बादल बेले, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख यांनी वन्यजीव संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयीची आस्था निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जयश्री धोटे यांनी मानले. चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग घेतला. वन्यजीव सप्ताहानिमित्त आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी वन्यजीव, जंगल, जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनावर आधारित विविध आकर्षक चित्रे साकारली.

स्पर्धेत प्रथम क्रमांक धनश्री नंदीगमवार, द्वितीय क्रमांक निकिता तपासे तर तृतीय क्रमांक वेदांती भोंगळे यांनी पटकावला. तसेच तमन्ना मोतकुलवार, अहिशा धानोरकर आणि अक्षरा निमकर यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. जंगल आणि गावाचा देखावा ठरला विशेष आकर्षण
कार्यक्रमातील ‘जंगल आणि गाव’ तसेच ‘मानव-वन्यजीव संघर्ष’ या विषयांवर आधारित आकर्षक देखावा बादल बेले यांच्या मार्गदर्शनात साकारण्यात आला हा विशेष आकर्षण ठरला. या देखाव्याच्या माध्यमातून वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील वाढता संघर्ष, त्यामागील कारणे तसेच वन्यजीवांचे संरक्षण करण्याची गरज याबाबत प्रभावी संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांसह उपस्थितांनी या देखाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी मार्गदर्शन करताना मंगेश गिरडकर यांनी “जैवविविधतेचे संवर्धन हीच काळाची गरज असून, वन्यजीव आणि जंगलांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे,” असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल, राजुरा राष्ट्रीय हरितसेना–इको क्लब, वनविभाग राजुरा आणि सामाजिक वनीकरण परिक्षेत्र राजुरा यांनी अथक परिश्रम घेतले. वन्यजीव सप्ताह निमित्याने चित्रकला स्पर्धा, वृक्षदिंडी, निबंध स्पर्धा, सायकल रॅली काढून वन्यजीव संवर्धनाचा संदेश देत जनजागृती करण्यात आली.

    You cannot copy content of this page