संत गाडगेबाबा हे सामाजिक समता व अंधश्रद्धेच्या निर्मूलनाचे दूत  होते- दिग्ददर्शक शेखर रणखांबे

HomeNewsनागपुर डिवीजन

संत गाडगेबाबा हे सामाजिक समता व अंधश्रद्धेच्या निर्मूलनाचे दूत  होते- दिग्ददर्शक शेखर रणखांबे

– हौसाई वृद्धाश्रमात मराठी चित्रपट रुबाब च्या कलावंतांनी केली संत गाडगेबाबांना आदरांजली
गौतम नगरी चौफेर सांगली – संत गाडगेबाबा महाराज हे सामाजिक समता व अनिष्ठ रूढी परंपरा विरोधी, अंधश्रद्धेच्या निर्मूलनाचे दूत होते असे मत बहुचर्चित मराठी चित्रपट रुबाब या चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर रणखांबे यांनी व्यक्त केले.
सांगली येथील खासदार रामदासजी आठवले युथ फाऊंडेशन संचलित हौसाई वृद्धाश्रमात मराठी चित्रपट रुबाबच्या अभिनेत्यांनी व कलावंतांनी संत गाडगेबाबांना आदरांजली वाहिली. यावेळी संस्थापक अध्यक्ष संदेशभाऊ भंडारे, सचिन ठाणेकर, कुलदीप देवकुळे, सिने अभिनेते विशाल शिरतोडे तथास्तु कल्चरल अकॅडेमीच्या अध्यक्षा सौ रश्मीताई भंडारे उपस्थित होते. या प्रसंगी स्वागत प्रास्ताविक चेअरमन सिद्धार्थ कांबळे यांनी केले. तर सूत्रसंचालन हौसाई वृद्धाश्रमाचे समुपदेशक विजय लांडगे यांनी केले.

मराठी चित्रपटातील सांगली जिल्ह्याचे योगदान नेहमीच मोठं आहे आता शेखर रणखांबे आणि त्यांच्या सगळ्या टीमने रुबाबदार चित्रपट साकार करून पुन्हा एकदा सांगलीकरांचा गौरव केला आहे, गाडगेबाबांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी वृद्धाश्रमात भेट देऊन एक आदर्श निर्माण केला असून त्यांच्या कार्याला शुभेच्छा संदेश भाऊ भंडारे यांनी दिल्या.
           यावेळी उपाध्यक्ष जयवंत माळी,  तथास्तु कल्चरल अकॅडमीचे शाहीर चंद्रकांत गायकवाड, विभाग प्रमुख चैताली तातुगडे, विजय लांडगे, निलेश नवघरे, नलिनी कांबळे, माधुरी मुळीक ,संदीप कोरे, सोनिका कांबळे, रेश्मा ऐवळे, राहुल ऐवळे, रवींद्र  लांडगे, पूजा लोंढे, नंदाताई केंगार, वैशाली लांडगे, स्वप्नील ब्याळीकुळी, शामसुंदर गाडे, भारती लोंढे, अमित मुळीक, संस्थेचे पदाधिकारी, सभासद कर्मचारी व विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार अधीक्षक रेखा माळी यांनी मानले.

COMMENTS

You cannot copy content of this page