विमान कंपनीच्या मालकाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा- अन्यथा तीव्र आंदोलन
पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे उपसंपादक पुणे-( बारामती) दिनांक 23 फेब्रुवारी 2026रोजी भीम आर्मीच्या शिष्टमंडळाने संबंधित अजित दादा पवार महाराष्ट्र राज्याचे उमुख्यमंत्री विमान अपघातस्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. घटनेची सखोल माहिती घेतली व स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर बारामती तालुका पोलीस ठाणे येथे जाऊन मा. पोलीस निरीक्षक पवार साहेब यांना संबंधित दोषी व्यक्ती तसेच विमान कंपनीच्या मालकाविरुद्ध तात्काळ गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. भीम आर्मीचा स्पष्ट इशारा — दोषींवर तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असे ही यावेळी महणाले. यावेळी भीम आर्मीचे शिष्टमंडळ सदस्य: अशोक कांबळे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य भीम आर्मी, संदीप शेलार — उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य भीम आर्मी, दादासाहेब शिंदे — संघटक, महाराष्ट्र राज्य रवी गायकवाड — उपाध्यक्ष, मुंबई प्रदेश उपस्थित होते.



COMMENTS