– नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था व राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समिती सर्पमित्र संघटनेचा संयुक्त उपक्रम.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा – १७ फेब्रुवारी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समिती शाखा गडचांदूर तालुका कोरपना तर्फे श्री शंकर देवस्थान नोकारी (बैलमपूर) येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कोरपना तालुका महिला अध्यक्षा उषा टोंगे, उपाध्यक्षा अरुणा सालवटकर, सचिव सुलभा कुरेकर, राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समिती चे कोरपना तालुका अध्यक्ष अजय गिरटकर, उपाध्यक्ष दिपेश वनकर, शीतल धोटे, नगरसेविका न.प. गडचांदूर तथा संघटिका नेफडो, गडचांदूर शहर महिला अध्यक्षा लीना लांजेकर, उपाध्यक्षा किरण अहिरकर, कोषाध्यक्ष संघमित्रा ताकसांडे, संघटिका संध्या वाघाडे, वंदना मोरे, संघटिका, व्यंकटी जेलेवाड, वनरक्षक, बांबेझरी, रवी बुटले, महाराष्ट्र राज्य युवा उपाध्यक्ष, प्रतीक काकडे, राजुरा तालुका संघटक आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. श्री शंकर देवस्थान नोकारी (बैलमपूर) येथे महाशिवरात्री निमित्याने यात्रा भरते. महाराष्ट्र, तेलंगणा राज्यातील हजारो भाविक श्री शंकर देवस्थान येथे दर्शनाकरिता येतात. या दरम्यान मोठ्याप्रमाणात प्लास्टिक कचरा, प्लास्टिक बॉटल्स, कागदी, कापडी व इतर असा कचरा येथे होतो. त्यामुळे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था आणि राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समिती सर्पमित्र संघटनेच्या वतीने येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अतिशय निसर्गरम्य असे हे ठिकाण असून भक्त भाविकांना पावणारे श्री शंकर देवस्थान मंदिर देवस्थान येथे हजारो भाविक दर्शनाकरिता येतात. त्यामुळे येथील भक्तांना तसेच वन्यजीव आणि पर्यावरणाला कुठलीही हानी पोहचू नये म्हणून येथे मोठ्याप्रमाणात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याकरिता नगर परिषद गडचांदूर, ग्रामीण रुग्णालय गडचांदूर, ग्रामपंचायत नोकरी यांचे सहकार्य लाभले.

——————————————–
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था तथा राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समिती सर्पमित्र संघटना यांच्यावतीने भक्त भाविकांना आवाहन करण्यात आले की, आपण श्री शंकराचे मनोभावे दर्शन करतो. आपल्या सर्व इच्छा – आकांक्षा आणि मनोकामना पूर्ण व्हाव्या असे देवाकडे साकडे घालतो परंतु याठिकाणी होणाऱ्या कचऱ्याकडे दुर्लक्ष करतो. आपले अधिकार, हक्क आपण जसे जाणतो तसेच आपल्या कर्तव्याची जाणीव सुध्दा आपण ठेवून स्वच्छता अभियान राबवून आपला देवस्थान परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवला पाहिजे. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था अशा उपक्रमात पुढाकार घेऊन पर्यावरण आणि मानवता विकासाचे कार्य अविरतपणे करीत असते.
——————————————–



COMMENTS