गडचांदूर शहरात अवैध धंद्ये जबरदस्त पोलीस विभाग मस्त नागरीक त्रस्त

HomeNewsनागपुर डिवीजन

गडचांदूर शहरात अवैध धंद्ये जबरदस्त पोलीस विभाग मस्त नागरीक त्रस्त

गौतम नगरी चौफेर (संतोष पटकोटवार) – गडचांदूर शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्ये सूरु असल्याने नागरीकात नाराजीचे सूर ऐकायला मिळत आहे, ठिकठिकाणी अवैध दारू विक्री,सटापटी,गुटखा, सुगंधित तंबाकू,,जूगार,या,सारखे यूवापिडीच्या जिवनाशी खेडणारे व कॅंसरला आमंत्रित करणारे अवैध धंधे मोठ्या प्रमाणात सूरू असून या कडे गडचांदुर येथील ठाणेदाराचे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप नागरीकाकडून होत आहें तसेच गडचांदुर येथे राष्ट्रीय महामार्गाचे काम सूरू असल्याने गर्दीचे स्वरूप पहायला मिळत असून कोणत्याही नागरीकांचे अपघात होऊ नये व कोणाचाही नाहक बळी जाऊ नये यासाठी वाहतूक नियंत्रण पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात असून वाहतूक नियंत्रणाकडे ठाणेदाराचे दूर्लक्ष होत असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही  गडचांदूर शहरात अवैध धंदे जोमात सुरू असून पोलीस विभाग सुस्त नागरीक त्रस्त अशी वाईट अवस्था असून अवैध धंदे बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे, रात्र पाळीत सूरू असलेली अवैध दारूविक्रीमुळे युवापिढी दारूच्या आहारी जाऊन त्यांच्या संसारात बाधा निर्माण होत आहे मात्र ठाणेदारांना भेट देऊन पत्र व्यवहार करूनही बघ्याची भूमिका घेत असल्याने गडचांदूरात अवैध दारू, तंबाखू व गूटख्यामुळे विविध प्रकारचे आजार उत्पन्न होऊन जिवीत हानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे,सूरू असलेले अवैध धंदे बंद करण्याची मागणी नागरीका कडुन होत असून जर हे अवैध धंदे जैसे थे राहील्यास लवकरच पोलीस स्टेशन वर मोर्चा काढण्यात येईल,असा ईशारा नागरीकानी  दिला आहे

COMMENTS

You cannot copy content of this page