गोरेगावातील अनेक नागरी प्रश्नांवर रिपब्लिकन पक्ष आक्रमक पि/दक्षिण सहाय्यक आयुक्त यांना विवीध मागण्या करीता उपायुक्त परिमंडळ-4 (DMC) अंधेरी कार्यालयावर आंदोलनाचा इशारा

HomeNewsनागपुर डिवीजन

गोरेगावातील अनेक नागरी प्रश्नांवर रिपब्लिकन पक्ष आक्रमक पि/दक्षिण सहाय्यक आयुक्त यांना विवीध मागण्या करीता उपायुक्त परिमंडळ-4 (DMC) अंधेरी कार्यालयावर आंदोलनाचा इशारा



गौतम नगरी चौफेर (रमेश पाईकराव गोरेगाव)रिपब्लिकन पक्षाने गोरेगाव विधानसभेतील सर्व सामान्य नागरिकांना भेडसावणार्या प्रश्नावर अनेदा आक्रमक भूमिकेतून विवीध जनआंदोलनाद्वारे महानगरपालीकेचे लक्ष्य वेधले आहे व याच अनुशंघाने दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी
1] गोरेगाव पूर्व अशोक नगर कामा इस्टेट विभागातील सार्वजनिक शौचालय तोडण्याचे षडयंत्र कायमस्वरुपी थांबवण्यात यावेत व पर्यायी व्यवस्था म्हणून फुटपाथ वरील टाॅयलेट-कॅबिन हटवण्यात यावेत
2] गेल्या अनेक वर्षांपासून गोरेगाव पूर्व विभागातील ऑरेकल कंपनी समोरील अशोक नगर कामा इस्टेट उद्यानास थोर व स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतीराव फुले नाव देण्यात यावे व उद्यानात नागरिकांना सेवा पुरविण्यात याव्यात व लहान मुलांना खेळण्याचे साहीत्य व उद्यानाचे नूतनीकरण ढासळलेली भींत बाधणे,तुटलेल्या लोखंडी जाळ्या बसविणे व गोरेगाव पूर्व व पश्चिम विभागातील अनेक महत्त्वपूर्ण चौकात हायमास्ट लाईट बसविण्यात यावे

3] गोरेगाव पूर्व व पश्चिम विभागातील गोरेगाव पूर्व व पश्चिम रेल्वे स्टेशन परिसर व भगतसिंग नगर 1.नं. ते 2 नंबर लिंक रोड वरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मैदान व चौका पर्यत च्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी

4] गोरेगाव पूर्व विभागातील आरे रोड उडपी होटेल च्या बाजुला व चारभुजा ज्वेलर्स समोरील हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र तातडीने सुरु करण्याची मागणी व सिद्धार्थ रूग्णालया बाबद तातडीने खुलासा व हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रूग्णालयात सुविधांचा अभावामुळेच रुग्णांची हेळसांड या बाबद तातडीने कारवाई

5] गोरेगाव पूर्व विभागातील चेतना बार समोरील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक संत रविदास महाराज नगर कामा इस्टेट गोरेगाव पूर्व येथील श्रीसाई मंदिराची जागा बळकवणार्या वरती व त्याच्या आडून भर रस्त्यावर अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात यावी

6] गोरेगाव पूर्व विभागातील कॅटल मार्केट हटवण्यात येवुन सदरील रस्ता हा नागरिकांन करीता की अनधिकृत फेरीवाल्यां करीता की अनधिकृत पार्किंग करीता व राहीली कसर बेशिस्त रिक्षाचालकाच्या मनमानीला चाप बसवत अनधिकृत फेरीवाल्यांवर व अनधिकृत पार्किंग व बेशिस्त रिक्षाचालकावरती बृहन्मुंबई महानगर पालीका व वाहतूक विभागाने संयुक्तपने कारवाई करण्याच्या मागणी

7] गोरेगाव पूर्व कामा इस्टेट विभागातील संत रविदास महाराज नगर,गणेश नगर नंबर 1 व 2 नविन अशोक नगर कामा इस्टेट येथील सांडपानी वाहुन नेणारी गटारे,घरगल्या लादीकरन करण्यात यावे व कामा इस्टेट परीसरातील नागरीकांना पाण्याची वेळ वाढवून देण्याची व इतर मागण्यांसाठी 8 डिसेंबर 2025 रोजी सहाय्यक आयुक्त पि/दक्षिण विभाग महानगर पालीका कार्यालया वरती नागरिकांनच्या प्रश्नावर तातडीने कारवाई करण्यात यावी.या करीता आक्रोश निदर्शन आंदोलन आयोजित करण्यात आले होते.परंतु *सहाय्यक आयुक्त मा. अनिरूद्ध कुलकर्णी* हे नव्याने नियुक्त झाल्याने कारवाई करीता वेळ देण्याची विनंती केल्याने व जातीने लक्ष घालत कारवाई करण्याचे आश्वासन दील्याने नियोजित आंदोलन तात्पुरते स्थगीत करण्यात आले.व त्या नंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका घोषित झाल्याने या मागण्यांबाबत कारवाई करीता वेळच मिळत नसल्याने व पालीकेचे दूर्लक्ष होत असल्याने.
आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीने *पि/दक्षिण विभागाचे पालीका सहाय्यक आयुक्त अनिरूद्ध कुलकर्णी* यांची भेट घेऊन त्यांना उपरोक्त मागण्यांबाबत स्मरण पत्र देवुन कारवाई करण्याची विनंती व सदर मागण्यांबाबत येत्या सात दिवसात अपेक्षित कारवाई न झाल्यास *पि/ दक्षिण विभागाच्या विरोधात मा.उपायुक्त परिमंडळ-4 [ DMC] अंधेरी प.येथील मनपा कार्यालया* वरती *आक्रोश निदर्शन आंदोलनाचा* इशारा *रिपब्लिकन पक्ष गोरेगाव विधानसभेच्या वतीने*  देण्यात आला या प्रसंगी रिपब्लिकन पक्षाच्या महीला आघाडी उत्तर-पश्चिम मूंबई जिल्हाध्यक्ष *मा.रेश्मा खानजी* उपस्थित होत्या
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
आपला नम्र
रमेश वि.पाईकराव
अध्यक्ष गोरेगाव तालुका व उत्तर-पश्चिम मूंबई जिल्हाप्रमुख आय.टि.सेल *रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ)

COMMENTS

You cannot copy content of this page