राजश्री शाहू महाराज, जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेअंतर्गत योग्य कलाकारांना न्याय द्या

HomeNewsनागपुर डिवीजन

राजश्री शाहू महाराज, जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेअंतर्गत योग्य कलाकारांना न्याय द्या

जिल्हाधिकारी यांना भारतीय लोक कलाकार सांस्कृतिक संघटनेचे निवेदन
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – भारतीय लोक कलाकार सांस्कृतिक संघटना भंडारा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांना भारतीय लोककलाकार सांस्कृतिक संघटना भंडारा जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले. सविस्तर वृत्त असे की ,राजश्री शाहू महाराज ,जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना अंतर्गत जिल्ह्यातील निवड समितीमध्ये लोककलेतील सुप्रसिद्ध तथा तज्ञ अशा जिल्ह्यातील सातही तालुक्यातील एका कलावंतांना नियुक्ती करण्यात यावे, सदर योजनेअंतर्गत आर्थिक देवाण-घेवाण करणाऱ्या सदस्य व त्यांच्या दलालांवरती कठोर कारवाई करण्यात यावी, अपंग कलावंतांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, याबाबतचे निवेदन देण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की भंडारा जिल्हा झाडीपट्टीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे विदर्भातून भंडारा जिल्हा कलावंतांची खान म्हणून ओळखले जाते. आपल्या जिल्ह्यात सर्वात जास्त कलावंत त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यात खडी गंमत ,भजन, कीर्तन, गोंधळ, नाटक, प्रबोधनकार, साहित्यिक, डहाका, पोवाडा इत्यादी जिल्ह्यातील कलावंतांनी स्वतः व घरावर तुळशीपत्र वाहून आजपर्यंत लोककला जिवंत  ठेवली. परंतु लोककला जिवंत ठेवायची असेल तर लोककलावंतांनाही जिवंत ठेवणे काळाची गरज आहे. त्यामुळे शासन वृद्ध कलावंतांना मान सन्मानाने, स्वाभिमानाने, वृद्ध कलावंतांना मासिक मानधन देत आहे. परंतु याही योजनेला खऱ्या अर्थाने भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील गरजू कलावंत या शासनाच्या मानधन योजने पासून दूर आहेत .यावरील समस्त गंभीर विषयाला जबाबदार असेल तर शासनाची ही योजना. या योजनेचा लाभ समस्त जिल्ह्यातील कलावंताचा मिळावा म्हणून जिल्ह्यातील निवड समिती तयार करण्यात आली आहे.या समितीमध्ये राजश्री शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कला व मानधन समिती एकूण 15 लोकांची समिती .

या समितीमध्ये पाच सदस्य शासनाच्या स्तरावर निवडाचे असतात .परंतु या समितीवर दहा सदस्यांपैकी जास्तीत जास्त सदस्य साहित्यिक दिसून येत आहेत .आपल्या जिल्ह्यात फक्त साहित्यिकच कलावंत नाहीत तर लोककलेचा समस्त कलावंत असल्यामुळे हे बाकीचे सदस्य खऱ्या कलावंताची ओळख कशी काय करतील.वरील निवड समितीमधील सदस्य राजकीय पार्टीचे असल्यामुळे यांची निवड होत आहे .सदर योजना ही वृद्ध कलावंताची आहे त्यामुळे वृद्ध  कलावंतांनाच या निवड समितीमध्ये घेण्यात यावेत .वरील जिल्हास्तरीय निवड समितीमध्ये एकही शाहीर, कवी, गायक, कीर्तनकार, गोंधळ, भजनकार, इत्यादी लोककलेतील तज्ञ व्यक्ती  समिती मध्ये नसल्यामुळे आपल्या जिल्ह्यातील खऱ्या अर्थाने लोक कलेचा अभ्यासच नाही. या सदस्याने कधीच कोणतीच कला सादर केली नाही. त्यामुळे सदस्य कलावंताची निवड कसे करणार ?खऱ्या कलावंतांना काय न्याय देणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे. जिल्ह्यातील परिचित बोगस कलावंतांची आर्थिक देवानघेवान करून बोगस कलावंतांची नावे मंजूर करत आहेत. तसेच दलांची टोळी सक्रिय झालेली आहे. त्यामुळे खरे कलाकार गरीब असल्यामुळे योजनेपासून वंचित आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील कलावंतांची वरील योजनेअंतर्गत निवड करण्यात येते . गरजू कलावंतांची मंजूर यादी कृपया जिल्हा माहिती कार्यरत प्रकाशित करण्यात यावी . सदर यादीवर आक्षेप घेण्याकरता काही अवधी सुद्धा देण्यात यावा. असे केल्यास जिल्ह्यात ज्या कलावंतांची नावे मंजूर होणारअसे नावे अनेक संघटनांना , संस्थांना व जिल्ह्यातील कलावंतांना माहिती होईल. खरा कलावंत कोण आहे आणि बोगस  कोण आहे जर बोगस केलावंतांची नावे मंजूर होत असतील तर जिल्ह्यातील कलावंत त्यावर आक्षेप घेऊन कायदेशीर वाटचाल केल्याने या शासनाच्या योजनेला लागलेला भ्रष्टाचाराचा ग्रहण बंद होईल व जिल्ह्यातील खऱ्या व सर्व कलावंतांना न्याय मिळेल. तसेच शासनाची तिजोरी रिकामी होणार नाही .वयक्तिक वृद्ध कलावंत मानसन्माने स्वाभिमानाने जगू शकतील .या निवेदनाची प्रत सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, पालकमंत्री भंडारा जिल्हा, मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांना देण्यात आले. यावेळी भारतीय लोक कलाकार संघटना चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश काळे ,प्रदेशाध्यक्ष माधुरी घोडमारे, भंडारा जिल्हा अध्यक्ष श्रीकांत नागदेवे , साकोली तालुका अध्यक्ष कवी गायक उमेश बोरकर नागपूर शहर अध्यक्ष सविता गाठ्किने महाराष्ट्र संघटक सुनील दहाट नागपूर शहर अध्यक्ष रवींद्र भीमोले तुमसर उपाध्यक्ष राहंडाले तुमसर तालुकाध्यक्ष गणेश मेश्राम यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

COMMENTS

You cannot copy content of this page