गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा – येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला सन्मान समारोह उत्साहात संपन्न झाला. समाजासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या ज्येष्ठांच्या कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघातील ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या अनुभवांचे कथन करत, तरुण पिढीला मार्गदर्शन केले. ज्येष्ठांचे अनुभव हे समाजासाठी अनमोल ठेवा असून त्यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने समाज प्रगती करतो, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
या सोहळ्याला परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते.या वेळी बोलताना ऍड वामनराव चटप ह्यांनी ज्येष्टांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन दैनंदिन समस्या सोडविण्यात सहकार्य घेण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या संपत्ती आपल्या शेवटच्या स्वासापर्यंत आपल्या कडे कायम ठेवावे अनेक नागरिक आपले जीवनभराची कमाई मुलांच्या नावे करतात आणी शेवटी आपल्या आरोग्य व इतर समस्या साठी त्यांना आपल्या मुलांसमोर हात पसारावे लागतात. ही परिसस्थिती टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले. ह्यावेळी नगराध्यक्ष अरुण धोटे. माजी आमदार सुदर्शन निमकर. ऍड अरुण धोटे. उपनगराध्यक्ष दिलीप देरकर. माजी नगराध्यक्ष स्वामी एरोलवार. रमेश नळे. अविनाश जाधव. सुदर्शन दाचेवार. ह्यांची उपसस्थिती होती. ह्यावेळी नुकतेच सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याचा सत्कार करण्यात आला
संपूर्ण कार्यक्रम खेळीमेळीच्या आणि आनंदमय वातावरणात पार पडला.
