निरोगी जीवनाचा मूलमंत्र योग: आमदार देवराव भोंगळे

HomeNewsनागपुर डिवीजन

निरोगी जीवनाचा मूलमंत्र योग: आमदार देवराव भोंगळे

गौतम नगरी चौफेर – १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात; तिरंगा चौकात सामूहिक योगाभ्यास.
राजुरा:
योग ही केवळ शारीरिक व्यायामाची पद्धत नसून शरीर, मन आणि आत्मा यांच्यात समतोल साधणारी जीवनशैली आहे. मन आणि तनाचे संतुलन राखण्याचे प्रभावी कार्य योग करतो. हजारो वर्षांची भारतीय परंपरा असलेला योग आज संपूर्ण जगाने स्वीकारला असून निरोगी शरीर, शांत मन आणि सकारात्मक विचारसरणीसाठी योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. निरोगी जीवनाचा मूलमंत्र योगाभ्यास आहे असे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.

१२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी, पतंजली योग परिवार आणि तालुका प्रशासन, राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषदेसमोरील तिरंगा झेंडा चौकात भव्य सामूहिक योगाभ्यास व योग प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांनी योगाभ्यास करत नागरिकांना योगाचे महत्त्व पटवून दिले.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत वाढता ताणतणाव, अनियमित दिनचर्या आणि विविध आरोग्य समस्यांवर मात करण्यासाठी योग प्रभावी माध्यम ठरत असल्याचे आमदार भोंगळे यांनी सांगितले. याप्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनीही योगाचे महत्त्व निरोगी जीवनासाठी विशद केले.

कार्यक्रमास नगराध्यक्ष अरुण धोटे,उपविभागीय अधिकारी बालाजी कदम, उपविभागीय वनाधिकारी मंगेश गिरडकर, गटविकास अधिकारी भागवत रेजीवाड, पोलिस निरीक्षक नितीन चिंचोळकर, नगर परिषद मुख्याधिकारी विवेक चौधरी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक जाधव, उपविभागीय अभियंता अभिषेक पुल्लावार, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नरसिंह तेलंग यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष वामन तुराणकर, शहराध्यक्ष सुरेश रागीट, शहर महामंत्री मिलिंद देशकर, राधेश्याम अडानिया, नगरसेवक प्रफुल कावळे, भूपेश मेश्राम, पतंजली योग समितीचे जिल्हा संघटन मंत्री पुंडलिक उराडे, मुखरू सेलोटे, दत्तात्रय मोरे, हरिभाऊ डोर्लीकर, प्रभाकर चन्ने, आनंद चलाख,भावना भोयर, चंद्रकला खंडाळे, तेजस्विनी कावळे, रमा एतलावार,सोनल चिडे , वनिता उराडे यांच्यासह भाजप पदाधिकारी, पतंजली योग परिवाराचे सदस्य, योग शिक्षक-शिक्षिका आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालक प्राध्यापक दत्तात्रय मोरे यांनी केले.
याप्रसंगी सामूहिक योगाभ्यास, प्राणायाम आणि ध्यानाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला . वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

You cannot copy content of this page