शेतकरी परिसंवादातून ज्ञानाची देवाणघेवाण; उत्कृष्ट शेतकऱ्यांचा सन्मान.

HomeNewsनागपुर डिवीजन

शेतकरी परिसंवादातून ज्ञानाची देवाणघेवाण; उत्कृष्ट शेतकऱ्यांचा सन्मान.

– मिरची पिकाच्या लागवडीपासून काढणीपर्यंत व इतर पिकाबाबतही मार्गदर्शन; महिला, युवा व प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव.

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.१ ऑक्टोबर रोटरी क्लब राजुरा व कृषक स्वराज यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी बांधवांसाठी शेतकरी परिसंवाद, प्रगतिशील शेतकऱ्यांसोबत संवाद व अनुभवांची देवाणघेवाण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ३० सप्टेंबर रोजी ओम साईराम मंगल कार्यालय, बामणी रोड, राजुरा येथे करण्यात आले. सकाळी ११:३० ते दुपारी ४.३५वाजेपर्यंत झालेल्या या कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी निरनिराळ्या तालुक्यातून शेतकरी उपस्थित झालेले होते. शेतीमध्ये पारंपरिक पिकांसोबत मिरची पिकाचा पर्यायी पीक म्हणून विचार, त्याची लागवड, खत व्यवस्थापन, फवारणी, रोग व किडींचे व्यवस्थापन, तसेच काढणीपर्यंतची प्रक्रिया याबाबत सविस्तर चर्चासत्र घेण्यात आले. विविध कृषी कंपन्यांच्या उत्पादनांचे स्टॉल्सही कार्यक्रमस्थळी लावण्यात आले होते. या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक कृषी योग्य वापर, फवारणीची पद्धत आणि शेतीतील नवीन तंत्रज्ञानाची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी तथा तालुका कृषी अधिकारी व बायोटेक कंपनी मान्यवर यांचेकडून देण्यात आली.महिला शेतकरी वर्षाच्या अनुषंगाने महिला शेतकऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला त्यामध्ये सुलभा बोरेकर राहणार चुनाळा यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच युवा शेतकरी बाळू पाटील वांढरे राहणार कोहपरा यांचा सत्कार करण्यात आला तसेच प्रगतिशील शेतकरी गजानन जुनगरी राहणार पेलोरा यांचा सुद्धा रोटरीच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला.

त्यांच्या शेतीतील योगदानाचा गौरव करण्यात आला. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना रोटरी क्लब राजुरा व कृषक स्वराज यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मानचिन्ह (शील्ड) प्रदान करण्यात आले. विशेष म्हणजे उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामासाठी उपयुक्त ठरतील असे चार्जिंगवर चालणारे फवारणी पंप रोटरी क्लब राजुरा तर्फे भेटस्वरूपात देण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष गरजा लक्षात घेऊन करण्यात आलेला हा उपक्रम उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला. या उपक्रमाच्या आयोजनासाठी आरटीएन सतीश गिरसावळे यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्याh प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वीपणे आकारास आला. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे ज्ञान, नवीन तंत्रज्ञानाची माहिती आणि प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल त्यांचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमानंतर कृषक स्वराज संस्था, उपस्थित शेतकरी तसेच पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी रोटरी क्लब राजुरा यांचे आभार मानले. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी अशा प्रकारचे ज्ञानवर्धक व प्रोत्साहनपर उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष राजू गोखरे, सचिव किशोर हिंगाणे तसेच माजी अध्यक्ष कमल बजाज नवल झंवर निखिल चांडक विनोद चन्ने केतन जुनगरे प्रोजेक्ट डायरेक्टर आरटीएन सतीश गिरसावळे, संचालक, रोटरी क्लब राजुरा व संपूर्ण संचालक मंडळांनी पुढाकार घेतला. व कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने व संपूर्ण शेतकऱ्यांसोबत बसून स्नेहभोजनाने करण्यात आले.

    You cannot copy content of this page