खामोना गावातील शेताच्या बांधावर दिलीप गिरसावळे यांच्या उपस्थितीत ऐकली ‘मन की बात’.- व्यसनमुक्तीच्या संदेशातून मजुरांना मिळाले ज्ञान!

HomeNewsनागपुर डिवीजन

खामोना गावातील शेताच्या बांधावर दिलीप गिरसावळे यांच्या उपस्थितीत ऐकली ‘मन की बात’.- व्यसनमुक्तीच्या संदेशातून मजुरांना मिळाले ज्ञान!

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.२७ सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १३८ व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या निमित्ताने खामोना गावातील एका शेतात आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम पाहायला मिळाला. शेतकरी हितचिंतक दिलीपभाऊ गिरसावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत, शेतात फवारणीचे काम करणाऱ्या मजूर बांधवांनी आणि शेतकऱ्यांनी कष्टाच्या कामातून वेळ काढत शेताच्या बांधावरच मोबाईलद्वारे हा कार्यक्रम ऐकला. या वेळी पंतप्रधानांनी देशवासीयांशी संवाद साधताना ‘नशामुक्त भारत’ (व्यसनमुक्ती) अभियानाचा विशेष उल्लेख केला हा संदेश ऐकल्यानंतर उपस्थित शेतमजुरांना संसारासाठी आणि आरोग्यासाठी अत्यंत मोलाचे ज्ञान मिळाले.

दिलीप गिरसावळे यांनी या वेळी उपस्थित मजूर आणि शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की, “पंतप्रधानांनी दिलेला व्यसनमुक्तीचा संदेश आपल्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाच्या हितासाठी आणि आरोग्यासाठी दिशादर्शक आहे. शेताच्या बांधावर राबणाऱ्या आपल्या बांधवांनी हा संदेश समजून घेणे, ही खऱ्या अर्थाने देशाची प्रगती आहे.”
“जे जे मोदीजींनी सांगितले, ते आम्ही आमच्या जीवनात उतरवण्याचा पूर्ण प्रयत्न करू,” अशा भावना या वेळी खामोना गावातील शेतकऱ्यांनी आणि मजुरांनी व्यक्त केल्या. कष्टाचे काम सुरू असतानाही वेळेत वेळ काढून, राष्ट्रीय विचारांशी जोडल्या गेलेल्या खामोना गावातील या जागरूक बांधवांचे आणि दिलीपभाऊ गिरसावळे यांच्या शेतकरी हिताच्या या पुढाकाराचे परिसरातून मोठे कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page