पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत निमिश पुरीचा जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक. विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड.

HomeNewsनागपुर डिवीजन

पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत निमिश पुरीचा जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक. विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड.

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.२१ सप्टेंबर
जिल्हास्तरीय १९ वर्षांखालील ५३ किलो वजनगटातील पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत राजुरा तालुक्यातील ॲड. यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी निमिश उद्धव पुरी याने प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. निमिश पुरी याच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात भर पडली असून, त्याच्या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. याकरिता संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. संजय धोटे, कोषाध्यक्ष सतीश धोटे, सचिव डॉ. अर्पित धोटे, अनुराधा धोटे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. वर्षा पोडे, पर्यवेक्षक प्रा. इर्शाद शेख, मार्गदर्शक शिक्षक प्रा. रोहित रांजीकर, प्रा. अल्पना कवाडे तसेच इतर सर्व विभागप्रमुख आणि सर्व प्राध्यापकवृंद यांनी निमिश पुरी याचे अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. निमिशने आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर मिळविलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. विभागस्तरीय स्पर्धेतही त्याने उत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा महाविद्यालयाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

You cannot copy content of this page