तुमसर नगर परिषदेच्या इमारतीत पीओपी कोसळले

HomeNewsनागपुर डिवीजन

तुमसर नगर परिषदेच्या इमारतीत पीओपी कोसळले

– निकृष्ट बांधकामावर प्रश्नचिन्ह, मोठा अनर्थ टळला…श्रीकृष्ण देशभ्रतार
“गौतम नागरी चौफेर”भंडारा/तुमसर :-
दि. २० सप्टेंबर तुमसर नगर परिषदेच्या इमारतीमधील आरोग्य विभागात स्लॅबचे ‘प्लास्टर ऑफ पेरिस’ (पीओपी) अचानक खाली कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने ही घटना १४ सप्टेंबर सोमवार गणेशचतुर्थी सुट्टीच्या दिवशी घडल्याने कार्यालयात कर्मचारी किंवा नागरिक उपस्थित नव्हते, ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, जर हा प्रकार नेहमीच्या कामकाजाच्या दिवशी घडला असता, तर गंभीर अनर्थ ओढवला असता.

नगर परिषदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन २०२२ मध्ये येथे प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली होती. नवीन इमारतीत स्थलांतरित होऊन पाच वर्षेही पूर्ण झाली नसतानाच, पीओपी कोसळल्याने प्रशासनाच्या कारभारावर आणि बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून हे बांधकाम करण्यात आल्याचा थेट आरोप आता नागरिक व लोकप्रतिनिधींकडून केला जात आहे.

एकीकडे बांधकामाच्या गुणवत्तेचा फज्जा उडालेला असताना, दुसरीकडे प्रशासकीय नियोजनाचाही गोंधळ समोर येत आहे. नगर परिषदेत जुने रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतंत्र ‘अभिलेख कक्ष’ उपलब्ध नाही. यामुळे अनेक वर्षांचे महत्त्वाचे जुने रेकॉर्ड उघड्यावर व जीर्ण अवस्थेत पडून आहे. नागरिकांना वेळेवर आवश्यक दाखले, कागदपत्रे व दाखल्यांच्या सत्यप्रती मिळण्यासाठी नाहक फेऱ्या माराव्या लागत असून मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

नवीन इमारतीचे एवढ्या कमी कालावधीत पीओपी कोसळल्यामुळे संबंधित कंत्राटदार नगर परिषदेच्या नवीन इमारतीमधील पीओपी इतक्या कमी कालावधीत कोसळणे हा निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा आणि भ्रष्टाचाराचा जिवंत पुरावा आहे. सुट्टीचा दिवस असल्याने मोठा अनर्थ टळला, पण या हलगर्जीपणाला जबाबदार असणा-य कंत्राटदारावर व अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई झाली पाहिजे.

  • अमित मेश्राम, संस्थापक अध्यक्ष, स्वराज्य युवा एकता फाऊंडेशन तुमसर, जि. भंडारा.

सदर प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि संबंधित दोषी कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच कोसळलेल्या पीओपीची तात्काळ दुरुस्ती केली जाईल. – करणकुमार चव्हाण, मुख्याधिकारी, नगर परिषद तुमसर, जि. भंडारा. आणि निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच, नागरिकांची गैरसोय थांबवण्यासाठी त्वरित अद्ययावत अभिलेख कक्ष सुरू करावा, अशी जोरदार मागणी तुमसर

You cannot copy content of this page