गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा – गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेत सर्पदर्शने तीन विद्यार्थी मृत्युमुखी पडल्याचे प्रकरण प्रकरण ताजे असतानाच आता चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात अमरु नाईक माध्यमिक आश्रम शाळेतील 30 विद्यार्थ्यांना जेवणातून विष बाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, डाळ भाजी शिजत असताना त्यात जिवंत पाल पडली पण सबंधित स्वयंपाकी कर्मचाऱ्यांना याची भानक लागली नाही.
…मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जिवती तालुक्यातील अमरु नाईक माध्यमिक आश्रम शाळा नगराळा मध्ये वर्ग 1 ते 10 पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहे.यात अंदाजे 50 च्या आसपास विद्यार्थी निवासी असल्याचे बोलले जात आहे. सकाळच्या वेळी डाळ भाजी शिजत असताना त्यात जिवंत पाल पडली पण स्वयपाकीला याची भानक लागली नाही. त्यानंतर 29 विद्यार्थी जेवणासाठी बसले. त् यांनी भाकर देखील खाल्ली.पण डाळ भाजी वाटप करणाऱ्या मुलींना पालीचे लहानमोठे तुकडे आढळून आले व त्यानंतर जेवण करण्यास मज्जाव करण्यात आला. मात्र तो पर्यंत विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ व पोटदुखी सुरू झाली. लगेच त्यांना जिवती मधील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.
त्यानंतर त्यांना उप जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. सध्या सर्वच विद्यार्थ्यांची तब्येत स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. निवासी मधील विद्यार्थी हे कुंभेझरी, पारधी गुडा, नागलोन,नोकेवाडी, पेदा आकसापूर, नगराळा, शंकर लोधी, नागपाडा आदी गावातील आहे.
….घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांचे आणि अधीक्षकांचे बयान घेण्यास सुरुवात केली आहे. अन्नाचा नमुना तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेमुळे आश्रमशाळेतील जेवणाच्या गुणवत्तेवर आणि स्वच्छतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
गडचिरोली पाठोपाठ आता जिवती तालुक्यातही असा प्रकार घडल्याने आदिवासी आश्रमशाळांच्या कारभाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


