निळ्या झेंड्यांचा महासागर

HomeNewsनागपुर डिवीजन

निळ्या झेंड्यांचा महासागर

उपवर्गीकरणा विरोधात मुंबईत आंबेडकरवादी शक्तीचे विराट प्रदर्शन !

गौतम नगरी चौफेर न्यूज मुंबई / प्रतिनिधी:अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात मुंबईत आज हजारों भीमसैनिकांनी पक्षीय भेद विसरून एकत्र येत अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन केले, निळ्या झेंड्यांच्या साक्षीने आणि जय भीमच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आंबेडकरवादी कार्यकत्यांनी सामाजिक न्याय आणि संविधानिक हक्कांच्या रक्षणासाठी एकजुटीचे दर्शन घडवले. आंदोलना दरम्यान उपवर्गीकरण तात्काळ रद्द करा, जाती जातीत फूट पाडू नका, संविधान वाचवा, आरक्षण वाचवा अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले. अनुसूचित जातींमध्ये फूट पाडणारा कोणताही निर्णय स्वीकारला जाणार नसल्याचा ठाम इशारा आंदोलकांनी सरकारला दिला. या विराट आंदोलनात युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध आंबेडकरवादी संघटनांचे हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करत सामाजिक न्याय, संविधानाचे संरक्षण आणि आरक्षण अबाधित ठेवण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष मा. सिद्धार्थ भाई कासारे यांच्या नेतृत्वाखाली

मुंबईतील रिपब्लिकन पदाधिकान्यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ड. अमयाताई सोनवणे, मुंबई प्रदेश अध्यक्षा मा. उषाताई रामतू, उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्षा मा. रेश्मा खान यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी व

कार्यकत्यांची लक्षणीय उपस्थिती होती. आंबेडकरवादी एकजूट, सामाजिक न्याय आणि संविधान रक्षणाचा बुलंद संदेश देणाऱ्या या आंदोलनाने मुंबईत जनहशतीचे भया दर्शन घडवले असून, उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी आंदोलकांनी पुन्हा एकदा शासनाकडे जोरकसपणे केली.

You cannot copy content of this page