योग नृत्य परिवारातर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा.

HomeNewsनागपुर डिवीजन

योग नृत्य परिवारातर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा.

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि. २१ :
आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिन निमित्त योग नृत्य परिवार, राजुरा यांच्या वतीने श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानात मोठ्या उत्साहात योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत योगाचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून अनुभवले. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक रतनदादा काटोले मित्र परिवार राजुरा होते. उपस्थित सर्वांनी नियमित योग करण्याचा संकल्प केला. योगामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य उत्तम राहते, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाला रामदास पुडके, घनश्याम हिंगाने, रमेश लोणारे, किशोर ताजने, विनय टिकले, मंगेश कोंडेकर, संदेश राठोड, संतोष खामणकर, हितेश जयपूरकर, वंदना पुडके, सुजाता राठोड, ज्ञानेश्वरी शिंदे, शाहू पवार, आशा उरकुडे, वंदना देवगडे, तामगाडगे काकू तसेच योग नृत्य परिवारातील सर्व महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता सर्वांनी एकत्रित योगासनांचे प्रात्यक्षिक करून व “करू योग, राहू निरोग” हा संदेश देत करण्यात आली.

You cannot copy content of this page