रावणवाडी येथील शेतकरी प्रशिक्षण वर्गाला पत्रकार संजीव भांबोरे यांनी दिली भेट

HomeNewsनागपुर डिवीजन

रावणवाडी येथील शेतकरी प्रशिक्षण वर्गाला पत्रकार संजीव भांबोरे यांनी दिली भेट

– मंडल कृषी अधिकारी अशोक जिभकाटे यांच्याशी प्रशिक्षण वर्गाबाबत केली चर्चा
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे
भंडारा –
तालुक्यातील रावणवाडी येथे आज दिनांक 19 जून 2026 ला पत्रकार संजीव भांबोरे यांनी शेतकरी प्रशिक्षण वर्गाला भेट देऊन पहेला मंडळ कृषी अधिकारी अशोक जिभकाटे यांच्याशी प्रशिक्षण वर्गाबाबत चर्चा केली . यावेळी त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासन कृषी विभाग राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अन्नधान्य पिके सन 2026 /27 अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तालुका उपकृषी अधिकारी वासनिक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, आर डी भोयर सहाय्यक कृषी अधिकारी, ये डी हटवार सहाय्यक कृषी अधिकारी, समूह सहाय्यक प्रियल धाबेकर , देवेंद्र भोंगाडे, ललिता भलावी हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी परिसरातील शेतकरी ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते

You cannot copy content of this page