गौतम नागरी चौफेर बादल बेले राजुरा – दुसऱ्यांदा मिळाली प्रथम क्रमांकाची मानाची ट्रॉफी.- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे होते पर्यावरण संमेलन.
राजुरा १२ मे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे नुकतेच १० मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील जय वासुदेवानंद हॉल मध्ये ५ वे राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलन पार पडले. यावेळी पर्यावरण संवर्धन व मानवता विकासाचे वर्षभर राबविलेले उपक्रम,कार्यक्रम, सदस्य नोंदणी, शासकीय योजनामधील सहभाग व जनजागृती, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन , पाणी अडवा पाणी जिरवा, गरजूंना मदत, पर्यटनाला चालना देणे, समाजात आवश्यक ते सकारात्मक बदल घडवणे आदींवर आधारित राष्ट्रीय पातळीवर मूल्यांकन करून राज्यातून क्रमांक दिले जातात. यात प्रथम क्रमांक राजुरा तालुका, द्वितीय क्रमांक पालघर जिल्हा, तृतीय क्रमांक मुल तालुक्याला मिळाला. ट्रॉफी पुरस्कार भेट देऊन त्यांना गौरविण्यात आले. सुरुवातीला कुडाळ येथील शंकराच्या मंदिरा मध्ये दर्शन घेऊन वृक्ष दिंडीला सुरुवात करण्यात आली. वृक्ष दिंडी चे विशेष आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा , गणपती , नारदमुनी या वेशभूषा ही साकारण्यात आल्या होत्या. पारंपरिक वाद्य व बैलगाडी हे सर्व या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते.
पर्यावरण पूरक घोषवाक्य ,वृक्षदिंडी मध्ये करण्यात आली. “तूच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार” वामनराव पै या सांप्रदाय मधील भक्तगण दिंडी सह सहभागी झाले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी शिक्षण मंत्री आमदार दिपक केसरकर व जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून तन्वी चांदोस्कर , सभापती, देवगड नगरपंचायत या होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुयोग धस उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय खजिनदार अपर्णा धस, राष्ट्रीय सदस्या संगीता धस, राष्ट्रीय सचिव आशिया रिजवी , महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले , सचिव बापू परब , गोवा राज्य अध्यक्ष जोवेल डिसिल्व्हा , युवा राज्याध्यक्ष बबलू चव्हाण तसेच सर्व जिल्ह्यांचे तालुक्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष , सचिव , संघटक सदस्य हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच ऋतुजा गवस यांनी काढलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रकाश कदम यांच्या निसर्ग फोटो गॅलरीचे ही उद्घाटन करण्यात आले. तसेच या कार्यक्रमांमध्ये पर्यावरणावर व ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते .विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचे वर्षभर केलेल्या कार्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .
सर्व मान्यवरांनी पर्यावरण आणि मानवता विकास संदर्भात थोडक्यात मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याची वर्षभराची कामगिरी पाहून त्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा गवस यांनी केले. तर आभार बापू परब यांनी मानले. राष्ट्रीय अध्यक्ष सुयोग धस, उपाध्यक्ष दिपक भवर, महासचिव आशिया रिजवी, राज्याध्यक्ष बादल बेले, उपाध्यक्ष प्रकाश कदम, सचिव बापू परब, महिला राज्याध्यक्षा डॉ. प्रीती तोटावार, उपाध्यक्षा तेजस्विनी नागोसे, महासचिव रत्ना चौधरी आदींनी अभिनंदन केले.
——————————————–
राजुरा तालुक्याला प्रथम क्रमांकाचा सलग दुसऱ्यांदा बहुमान
चंद्रपूर जिल्ह्यातील मुल येथे २०२५ मधे झालेल्या चौथ्या राष्ट्रीय पर्यावरण संमेलनातही राजुरा तालुका राज्यात प्रथम क्रमांकावर होता. तर २०२६ कुडाळ येथील पाचव्या पर्यावरण संमेलनात सुद्धा राज्यातून प्रथम येण्याचा बहुमान राजुरा तालुक्याला मिळाला. यामुळे राजुरा तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक बहुमान वाढला तसेच जबाबदारी सुद्धा वाढली असल्याचे मत राजुरा टीम ने मांडले.
——————————————–


COMMENTS