– सडक अर्जुनी येथे भेटी दरम्यान भंडारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना दिले निर्देश
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांची सडक अर्जुनी येथे भंडारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी दिनांक 27 एप्रिल 2026 ला प्रत्यक्ष भेट घेतली असता डॉ. भीमराव रामजी आंबेडकर मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँकेचे 4000 हजार शेअर्स होल्डर बनवून बाबासाहेबांचे पदस्पर्श झालेल्या भंडारा जिल्ह्यामध्ये बौद्धांची स्वतंत्र बँक उभारावी असे डॉ.राजरत्न आंबेडकर यांनी पदाधिकाऱ्यांना आदेश दिले. चर्चेदरम्यान भंडारा जिल्हाध्यक्ष डॉ .प्रवीण थुलकर, महासचिव मनोज बनसोड, माजी. सभापती डॉ.सुनील जीवनतारे, प्रेमानंद गोस्वामी, मुकुंदा मेश्राम प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते.



COMMENTS