– इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा १० एप्रिल बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आशादेवी मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था चनाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. तसेच समग्र शिक्षा समावेशित शिक्षण अंतर्गत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनी कु. सादिका रमेश कवलकर हिला अंशतः अंध असल्याने लो व्हिजन साहित्य वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश धोटे यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून सचिव भास्करराव येसेकर , संचालक मधुकरराव जानवे, मुख्याध्यापक तथा चणाखा ग्रामीण अध्यक्ष दिपक सातपुते, दिवाकर चाचरकर विशेष शिक्षक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बंडू बोढे यांनी केले. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री दिपक सातपुते यांनी केले. तर आभार कू सुवर्णा कोकोडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कू सोनल नक्षीने, श्री दिपक मडावी, कू नेहा तळवेकर, कू सविता गेडेकर, सौ सविता शेंडे, श्रीमती मयुरी आकेवार यांनी अथक परिश्रम घेतले.



COMMENTS