गौतम नगरी चौफेर //अशोककुमार उमरे// हरदोना बुद्रुक व खुर्द येथील महामार्गावर दुभाजक कट देऊन गंभीर समस्यांचे निराकरण करण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे अनैशा वाहन चालक कामगार संघटनेच्या वतीने मागणी.
राजुरा ते आदिलाबाद बनवण्यात आलेला गोविंदपुर NH 153 B महामार्गावरील हरदोना (बूज.) व (खुर्द) तसेच कुकुडसात,निंबाळा, उपरवाही, या गावकऱ्यांना गावामध्ये प्रवेश करण्यासाठी दुभाजक कट (U TURN) नसल्याने स्थानिक शेतकरी, त्यांच्या बैलबंडी, सायकल, मोटार सायकल, शाळकरी विद्यार्थी यांना अपघाताला तोंड देत व कित्येक अंतर विरूद्ध दिशेने जात वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
आता नुकताच बनवण्यात आलेला राजुरा गोविंदपुर महामार्ग,या महामार्गावरील येणारे गाव हरदोना (बूज) व (खुर्द) या गावकऱ्यांना गावात जाण्याकरिता कसल्याही प्रकारचा दुभाजक कट (U TURN) दिलेला नाही.

गावकरी आपले बैलबंडी,शाळकरी मुलांचे बसेस,मोटारसायकल किंवा इतर वाहने हे रस्त्याच्या विरुद्ध दिशेने चालवत असतात.या मागचे कारण म्हणजेच फक्त आणि फक्त दुभासकास कट दिलेला नाही.आणि जर गावकरी विरुद्ध दिशा न स्वीकारता सरळ रस्त्यांनी प्रवास केल्यास कमीत कमी अंदाजे 3 ते 4 किमी अंतर गाठून थूटरा या गावाजवळील (U TURN) चा वापर करून परत तेवढेच अंतर यावे लागते.हे वाहनांना शक्य आहे असे आपण गृहीत धरू.पण बैलबंडी आपल्यास 3 ते 4 किमी अंतर जाणे तेवढे अंतर परत येणे म्हणजेच एक प्रकारची तारेवरची कसरत करावी लागत आहे.त्या वाहनांना सुद्धा असेच विरुद्ध दिशेने प्रवास करून आपल्याला तारेची कसरत करावे लागत आहे. आणि गावालगत उद्योग धंदे,सिमेंट प्लॅन्ट आहेत,त्याकरिता वाहतूक फार मोठ्या प्रमाणात चालत असते.
हरदोना या गावातील लोकसंख्या 2079 आहे. हे सर्व गावकरी आपली रोजची कामे पूर्ण करण्याकरिता विरुद्ध दिशेने प्रवास करत असतात.या विरुद्ध दिशेने प्रवास करणे म्हणजेच आपला जीव मुठीत घेऊन चालणे आहे. कारण वाहतूक ही खूप मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने दुर्घटना धडण्याची दाट शक्यता आहे. आणि आपण हे नाकारू शकत नाही. कारण यापूर्वी पुष्कळ अपघात घडलेले आहे. आणि हरदोना गावामधून आत असलेल्या गावांना सुधा या समस्यांना मात करत तोंड द्यावे लागत आहे. ही समस्या मार्गी लावण्यात यावी.
अशी मागणी अनैशा वाहन चालक कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष सुरजभाऊ उपरे,चंद्रपूर जिल्हा महिला अध्यक्ष सरिता मालू,चंद्रपूर युवा जिल्हा अध्यक्ष चंपतभाऊ राजूरकर, उस्मान शेख, संकेत काटाईत, समीर भोयर, अजय सोयाम, अजय आत्राम, बादल टेकाम, आनंद कुंभे इत्यादींनी एका निवेदनाद्वारे केंद्रीय सामाजिक न्याय नामदार रामदास आठवले यांच्याकडे केली आहे.


COMMENTS