महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खाते असलेल्या रास्त भाव दुकानदारांचे ७. महिन्याचे कमिशन केव्हा मिळणार ?

HomeNewsनागपुर डिवीजन

महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खाते असलेल्या रास्त भाव दुकानदारांचे ७. महिन्याचे कमिशन केव्हा मिळणार ?

रास्त भाव दुकानदारांवर उपासमारीची पाळी
छगन भुजबळ साहेब अन्नपुरवठा मंत्री लक्ष देतील काय?
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खाते असलेल्या रास्त भाव दुकानदारांचे मागील ७ महिन्यापासून सरकारी रास्त भाव दुकानदारांचे कमिशन मिळालेले नाही. त्यामुळे रास्त भाव दुकानदार आर्थिक अडचणीत सापडलेला असून त्यांनी आपला उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न निर्माण झालेला आहे. शासनाच्या अन्नपुरवठा विभागाने याकडे तात्काळ लक्ष घालून या दुकानदारांचे थकीत असलेले ७ महिन्याचे कमिशन तात्काळ देण्यात यावे अशी मागणी रास्त भाव दुकानदारांची आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी याकडे तात्काळ लक्ष घालून दुकानदारांना मिळत असलेली अल्प कमिशन तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात यावे व दुकानदारांना काम करण्याची एनर्जी प्राप्त करावी अशी मागणी सुद्धा दुकानदारांच्या वतीने करण्यात येत आहे. एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार महिन्याला वेळेवर मिळाला नाही तर त्यांच्यावर उपासमारीची पाळी येते मग या जास्त भाव दुकानदारांना अल्प कमिशन मिळते त्यांची परिस्थिती काय असेल याचे गांभीर्य शासनाने ओळखावे. आज पर्यंत आलेल्या सरकारने सर्वांचे भले केले परंतु राशन दुकानदारांना फक्त कमिशन देऊन एजंट , दलाल बनवून त्यांच्याकडून कार्डधारकांना धान्य वाटप करण्याचे काम सुरू आहे.परंतु त्यांना मानधन किंवा वेतनश्रेणीचा विचार मागील पन्नास वर्षापासून करण्यात आलेला नाही. ही या महाराष्ट्रातील सरकारी रास्त भाव दुकानदारांची शोकांतिका आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page