भंडारा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद कामगिरी
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – राज्यस्तरीय पातळीवर घेण्यात आलेल्या पुस्तक परीक्षण स्पर्धेत प्रा. सुरज गोंडाणे यांनी उल्लेखनीय यश संपादन करत भंडारा जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे. त्यांच्या या यशामुळे शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रात समाधान आणि अभिमानाची भावना व्यक्त केली जात आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याद्वारे आयोजित राज्य मंडळाच्या अधिनस्त असणाऱ्या सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित, अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, डाएट मधील अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षण विभागातील पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये शैक्षणिक, प्रशासकीय कौशल्य वृद्धींगत करणे, त्यांच्यात समन्वय , सहकार्य व स्पर्धात्मकतेची भावना निर्माण करणे तसेच त्यांच्यात डिजीटल , भाषिक व सादरीकरण कौशल्यांना चालना देण्याच्या उद्धेशाने आयोजीत विविध स्पर्धांपैकी राज्यस्तरीय पुस्तक परीक्षण स्पर्धा नुकतीच जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था बुलढाणा येथे आयोजीत करण्यात आली होती . या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील चाळीस स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेचा मुख्य उद्देश वाचनसंस्कृतीला चालना देणे, पुस्तक परीक्षणाच्या माध्यमातून साहित्याचा सखोल अभ्यास घडवून आणणे आणि नव्या विचारप्रवाहांना प्रोत्साहन देणे हा होता. या स्पर्धेत प्रा. सुरज गोंडाणे यांनी सादर केलेले पुस्तक परीक्षण आशयघनता, अभ्यासपूर्ण मांडणी, समतोल समीक्षा व प्रभावी भाषाशैली यामुळे परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरले.

या यशाबद्दल गांधी विद्यालय शिक्षण संस्था कोंढाचे अध्यक्ष अँड. आनंद जिभकाटे , उपाध्यक्ष नरेद्रजी कावडे, सचिव रामदासजी शहारे, गांधी विद्यालय व कनिष्ठ महा. पहेलाचे प्राचार्य योगेंद्र काटेखाये, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी , केंद्रप्रमुख सुधाकर कंकलवार , से. नि . प्राचार्य अनमोल देशपांडे, साहित्यिक डॉ . के . एल . देशपांडे, प्रा . रुपा गोंडाणे, मुख्याध्यापक पंडीत लोंढे ( वणी – वरोरा ) , मुख्याध्यापक क्रांतीलाल पटले साकोली , से. नि . प्राचार्य मोरेश्वर गेडाम, भंडारा जिल्ह्यातील शिक्षणप्रेमी, साहित्यिक, विद्यार्थी व सहकारी वर्गाकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


COMMENTS