– गडचांदूर येथील नागरिकांनी दिला जन आंदोलनाचा ईशारा
गौतम नगरी चौफेर (संतोष पटकोटवार) – गडचांदूर शहरा लगत लागुन असलेल्या माणीकगड सिमेंट कंपनीने नागरीकांच्या आरोग्याशी खेळ करू नये, अन्यथा मोठा जन आंदोलन उभारण्याचा इशारा गडचांदूर शहरातील नागरिकांनी दिला आहे
गडचांदूर शहराला लागून असलेल्या माणीकगड सिमेंट कंपनीमुळे नागरीक त्रस्त असल्याचे बोलले जात आहे,,,दिन मे भैय्या रात मे सय्या,, असा खेळ माणीकगड सिमेंट कंपनी गडचांदूर येथील नागरीकांशी खेळत आहे, अनेक वर्षांपासून रात्र पाळीमध्ये धूर सोडत आहे हवेद्वारे सरळ नागरीकांच्या ताटात व पोटात धूळ जात असल्याने गडचांदुरातील नागरीकांचे आयूष्य कमी होत असून भविष्यात पोटाचे विकार, हार्ट अटॅक, कॅन्सर सारखे आजार उत्पन्न होऊन जिवीत हाणी होण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे, यातच कचरा डंपिंग यार्ड मुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, मोठमोठ्या शहरातील गंदगी दिवसा ढवळ्या आनत आहे व गावाच्या बाहेर वाहने उभी करून नागरीक झोपी गेल्यानंतर चोरी छुपे रात्री उशिरापर्यंत गंदगीने कचरा भरलेला ट्रक माणीकगड सिमेंट डंपिंग यार्ड मध्ये खाली करीत असल्याने दूर्गंधीमूळे नागरिक हवालदिल झाले आहे,या कचरा डंपिंग यार्ड मुळे नागरीकांची कोंडी होत असून हे डंपिंग यार्ड गडचांदूर शहरातून हटविण्यात यावे कमीत कमी विस कीलोमिटर दूर डंपिंग करावे अशी मागणी नागरीक करीत आहे, कचरा डंपिंग यार्डच्या दूर्गंधीमूळे नागरीक त्रस्त झाले आहे, कचरा डंपिंग यार्ड ही ही समस्या माणीकगड सिमेंट कंपनीसाठी लहान असली तरी गडचांदूरकरांसाठी खुप मोठी आणी हाणीकारक आहे या समस्येविषयी आजी माजी आमदारांना निवेदन देण्यात आले असून आजी माजी आमदार व नगरपरिषदेचे अध्यक्ष व नवनिर्वाचित नगरसेवकांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन समस्या दूर करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे, तसेच माणीकगड सिमेंट कंपनीने कचरा डंपिंग यार्ड सारखी समस्या व धूळ फेक सारखी समस्या निर्माण करुन नागरीकांच्या आरोग्याशी खेळ करू नये व शहरातील शांतता भंग करू नये अन्यथा मोठा जन आंदोलन करण्याचा इशारा गडचांदूर शहरातील मनसे तालुकाध्यक्ष,सूरेश का़ंबळे, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश बिडकर, माजी नगरसेवक धनंजय छाजेड, समाजसुधारक मनोज भोजेकर, न,प,चे,माजी उपाध्यक्ष सचिन भोयर, हितेश चव्हाण, कांग्रेसचे माजी नगरसेवक विक्रम येरणे, सिद्धेश्वर केंद्रे तथा व्यापारी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सूज्ञ नागरिकांनी दिला आहे


COMMENTS