गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – तालुक्यातील श्रीनगर येथे आदर्श नवदुर्गा भजन मंडळ बोरगाव खुर्द यांच्या वतीने भजनी मंडळाच्या माध्यमातून प्रबोधनात्मक गीत सादर करून लोकांना मंत्रमुग्ध करीत असतात. सागर बावणे हे मागील 25 वर्षापासून प्रबोधनाचे काम करीत असून ते नेहमी आपल्या प्रबोधनातून लोकांना अंधश्रद्धा, दारूबंदी, हुंडाबळी, या विषयावर नेहमी मार्गदर्शन करीत असतात. आज पर्यंत त्यांनी आपल्या प्रबोधनातून भंडारा जिल्ह्यात कमीत कमी 40 गावात आपले मार्गदर्शन केलेले आहे व आजही ते आपल्या प्रबोधनातून लोकांना चांगल्या सवयी लागावे या दृष्टिकोनातून नेहमी प्रयत्न करीत असतात.

