जनजागर संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक नितीन राठोड यांच्या सत्कार

HomeNewsनागपुर डिवीजन

जनजागर संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक नितीन राठोड यांच्या सत्कार

(गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा) – जनजागर कला साहित्य बहुउद्देशीय संघटना साकोलीच्या वतीने साकोली पोलीस स्टेशन येथे नवनियुक्त पोलीस निरीक्षक नितीन राठोड यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
जनजागर संघटनेच्या वतीने साकोली तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये नव्याने रुजू होणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे स्वागत व सत्कार करण्याची परंपरा जपली जाते. त्याच उपक्रमांतर्गत हा सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक नितीन राठोड यांच्यासोबत आगामी मंडई उत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. पोलीस विभाग, स्थानिक कलावंत आणि गावातील आयोजक यांच्यामध्ये योग्य समन्वय साधून सांस्कृतिक कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, यावरही सकारात्मक चर्चा झाली.
याप्रसंगी जनजागर संघटनेचे अध्यक्ष भावेश कोटांगले, उपाध्यक्ष उमेश भोयर, संचालक कृष्णा हातझाडे, संदीप कोटांगले, लक्ष्मीकांत बोरकर व उत्तम उके उपस्थित होते.

You cannot copy content of this page