भंडारा येथील ओबीसी साखळी उपोषण मंडपात बळीराजा महोत्सव कार्यक्रम संपन्न

HomeNewsनागपुर डिवीजन

भंडारा येथील ओबीसी साखळी उपोषण मंडपात बळीराजा महोत्सव कार्यक्रम संपन्न

(गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा) – ओबीसी संघर्ष समिती जिल्हा भंडारा च्या वतीने “इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो, सिंधु संस्कृतीचा महानायक. रक्षक.प्रजाहित दक्षक न्यायी. संविभागी स्वामी तिन्ही जगाचा महादान असून महाबली सर्व भारतीयांचा आध्य दैव, कुलस्वामी, महासम्राट, बळीराजा, यांचा महोत्सव कार्यक्रम बेमुदत्त ओबीसी साखळी उपोषण त्रिमूर्ती चौक भंडारा, या ठिकाणी बळीराजा महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संविधान बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष रोशनजी जांभुळकर, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.बाळकृष्ण सार्वे मुख्य समन्वयक ओबीसी संघर्ष समिती भंडारा, संदानंद इलमे मुख्य समन्वयक ओबीसी संघर्ष समितीभंडारा, गोपाल सेलोकर, अध्यक्ष ओबीसी सेवा संघ भंडारा, रोशन उरकुडे विष्णुदास जगनाडे, पंजाबराव कारेमोरे, रमेश शहारे, यांनी महाबली, महादानशूर, बळीराजा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनोज बोरकर, यांनी केले आभार अरुण लुटे, यांनी मानले. तर कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी दुयोँधन अतकारी, किशोर डोकरीमारे, राजेश मडावी, ताराचंद देशमुख, मोरेश्वर तिजारे, अनिता बोरकर, वृद्धा गायधने, प्रतीक्षा बोरकर, रमेश वंजारी यांनी सहकार्य केले.

You cannot copy content of this page