सुरक्षा मंत्र’ जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न.

HomeNewsनागपुर डिवीजन

सुरक्षा मंत्र’ जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न.

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.३० सप्टेंबर चंद्रपूर पोलीस अधीक्षक कार्यालय, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली मुला-मुलींच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘सुरक्षा मंत्र’ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, राजुरा येथे करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्वतःची सुरक्षितता, गुड टच-बॅड टच, सायबर गुन्हे, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, छेडछाड व लैंगिक अत्याचारापासून संरक्षण, वाहतूक नियम, आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी तसेच कोणतीही अनुचित घटना घडल्यास तातडीने पालक, शिक्षक किंवा पोलिसांची मदत घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

पोलीस विभागाचे प्रतिनिधी बळीराम पवार, पोलीस अंमलदार पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर, श्रीमती दांडेकर मॅडम पोलीस कॉन्स्टेबल पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून ‘सावधानता हीच सुरक्षिततेची पहिली पायरी’ असल्याचे सांगितले.
मुलींनी भीती न बाळगता कोणत्याही गैरप्रकाराला विरोध करावा आणि प्रसंगी पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची व उपलब्ध मदत यंत्रणांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमास मुख्याध्यापक दयानंद चिंतलवार, पर्यवेक्षक राजू डाहुले, कनिष्ठ महाविद्यालय इन्चार्ज नरेश नुगुरुवार, कु. जाधव मॅडम, मिडल स्कूल इन्चार्ज काळे सर, जुनघरे सर, पाथर्ड सर, मेंढे सर, निमकर सर शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
“सुरक्षित विद्यार्थी – सुरक्षित समाज” हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

You cannot copy content of this page