राजुरा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त गडचांदूर नगर परिषदेत ध्वजारोहण

HomeNewsनागपुर डिवीजन

राजुरा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त गडचांदूर नगर परिषदेत ध्वजारोहण

– नगराध्यक्ष निलेश ताजने यांच्या हस्ते ध्वजारोहण; हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली
गौतम नगरी चौफेर संतोष पटकोटवार गडचांदूर (प्रतिनिधी) :
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील तसेच राजुरा मुक्तीसंग्रामाच्या ऐतिहासिक पर्वातील १७ सप्टेंबर या महत्त्वपूर्ण दिवसाचे औचित्य साधून गडचांदूर नगर परिषद कार्यालयाच्या प्रांगणात राजुरा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण व मानवंदना कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात संपन्न झाला.

गडचांदूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष निलेशजी ताजने यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर, नगरपरिषद अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर राजुरा मुक्तीसंग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या अमर हुतात्म्यांना तसेच स्वातंत्र्यसैनिकांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी बोलताना मान्यवरांनी राजुरा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान, त्याग आणि संघर्ष यांचे स्मरण करून त्यांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन राष्ट्रहित व समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.

प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाला गडचांदूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष संजय मेंढी, बांधकाम सभापती रामसेवकजी मोरे, मुख्याधिकारी आशिष चव्हाण यांच्यासह नगरपरिषदेचे विविध सभापती, सन्माननीय नगरसेवक-नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडला. उपस्थितांनी राजुरा मुक्तीसंग्रामातील हुतात्मे आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

You cannot copy content of this page