महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय व प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघाच्या संयुक्त विद्यमाने लोककलावंतांच्या राष्ट्रीय लोकशाही बाणा या कार्यक्रमाची आयोजन.
जिल्हा प्रतिनिधी श्रीकृष्ण देशभ्रतार “गौतम नगरी चौफेर” भंडारा :- विशेष प्रतिनिधी द्वारा वृत्त असे की ,महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालय व प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघाच्या संयुक्त विद्यमाने,महाराष्ट्र राज्यव्यापी लोक कलावंतांच्या राष्ट्रीय लोकशाही बाणा या कार्यक्रमाच्या योजन मा. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडवणीस यांच्या अध्यक्षते खाली व प्रमुख उपस्थिती केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी व स्वागताध्यक्ष म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले, तसेच महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री ना.राजकुमार जी बडोले. यांच्या उपस्थितीत, दि.18, ऑक्टोंबर 2026. दुपारी 2:00 वाजे ते सायंकाळी 6:00 वाजे पर्यंत, कविवर्य सुरेश भट्ट सभागृह रेशीम बाग नागपूर, येथे विविध राजकीय प्रतिनिधी सामाजिक साहित्यिक व प्रबोधनकार यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. करिता कार्यक्रमाचे आयोजक, सिने नट्या अभिनेता, कवी, गायक संगीतकार, प्रबोधनकार, अनिरुद्ध शेवाळे यांनी कार्यक्रमाला कवी ,गायक, प्रबोधनकार, रसिक यांना उपस्थित राहण्याचे आव्हान केले आहे.

