भंडारा जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती विभागाची कोथुर्णा गावाला भेट; नागरिकांच्या समस्यांवर सकारात्मक चर्चा

HomeNewsनागपुर डिवीजन

भंडारा जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती विभागाची कोथुर्णा गावाला भेट; नागरिकांच्या समस्यांवर सकारात्मक चर्चा

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे
भंडारा –
पोळा सणाचे औचित्य साधून भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. श्री. सावन कुमार साहेब आणि जिल्हा आपत्ती विभाग अधिकारी मा. श्री. अभिषेक नामदार साहेब यांनी आज कोथुर्णा (ता. भंडारा ) गावाला सदिच्छा भेट दिली.

यावेळी त्यांनी गावातील नागरिकांशी थेट संवाद साधला. नागरिकांनी मांडलेल्या विविध समस्या आणि अडचणी समजून घेत चर्चेच्या माध्यमातून अनेक प्रश्नांवर समाधानकारक तोडगा काढण्यात आला.

या भेटी दरम्यान त्यांनी प्रामुख्याने :

१. बिलासपूर – नागपूर रेल्वे महामार्गा अंतर्गत येणाऱ्या कोथुर्णा ते इंदुरखा रेल्वे उड्डाणपुलाच्या (ROB) कामाची पाहणी केली.

२. कोथुर्णा गावाच्या पुनर्वसनाबाबत गावकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. वैनगंगा नदीच्या पाण्यामुळे पुनर्वसन बाबतीत निर्माण होणाऱ्या अडचणी, शेती, घर आणि इतर सुविधांबाबत नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी साहेबांनी भविष्यात येणाऱ्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासकीय स्तरावर योग्य त्या सर्व उपाययोजना केल्या जातील, आणि पुढील काही दिवसात शासकीय विभागामार्फत सर्वे करण्यात येईल अशी ग्वाही नागरिकांना दिली.

या प्रसंगी जिल्हाधिकारी साहेबांनी रामेश्वर कांबळे त्यांच्या विनंतीला मान देऊन कोथुर्णा ला भेट दिली त्यावेळी गावातील गावातील सरपंच प्रदीप गायधने, येथील ग्रामसेवक गोकुळा सानप ,तलाठी प्रीती खोडे ,महसूल अधिकारी शेखर ठाकरे ,पिंटू ईश्वरकर ,गौरीशंकर मोरकुरे ,गिरिधारी उके,नरेश पवनकर ,दुर्योधन सोनटक्के ़आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि साहेबांनी सर्व शेतकऱ्यांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा दिल्या

You cannot copy content of this page