गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा (प्रतिनिधी) :- अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी धडक कारवाई करत तिघांना अटक केली आहे.
गुन्हा क्रमांक 3/25 अंतर्गत अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींच्या घरातून शस्त्र जप्त केले आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी :
1) कार्तिक खामनकर, वय 24 वर्ष
2) अंकित माश्रिरकर, वय 24 वर्ष
3) निर्भय वडेट्टीवार, वय 19 वर्ष
याशिवाय या प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ खामनकर यालाही पोलिसांनी अटक केली असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अटक केलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पीसीआर (पोलीस कोठडी) सुनावली आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.