गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि. ७ ऑगस्ट विभागीय वनाधिकारी सामाजिक वनीकरण चंद्रपूर यांचे मार्फत लोहारा रोपवाटिका येथे सामाजिक वनीकरण कर्मचारी यांचे करिता बायोचार निर्मिती कार्यशाळा तसेच शाकीय पुनरुत्पादन बाबत कर्मचारी प्रशिक्षण व रोपवाटिकातील महिला कर्मचारी यांना आरोग्य तपासणी शिबिर व पावसाळी जॅकेट वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमामध्ये बायोचार निर्मितीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच रोपांचे शाकीय पुनरुत्पादन कसे करायचे याबाबत कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले व रोपवाटिका मधील महिला कर्मचारी यांची आरोग्य तपासणी वैद्यकीय विभाग चंद्रपूर यांच्या मदतीने करण्यात आली. सदरची कार्यशाळा प्रधान मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण विवेक खांडेकर , मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर रामानुजन सर , उपवनसंरक्षक नागपूर पद्मनाभा यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेकरिता प्रमुख पाहुणे म्हणून ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे विभागीय वनाधिकारी सचिन शिंदे , श्रीमती मनीषा भिंगे अप्पर संचालक वन प्रबोधिनी चंद्रपूर, बापू येळे विभागीय वनाधिकारी सामाजिक वनीकरण चंद्रपूर , वैद्यकीय विभागातील डॉ. राठोड व त्यांचे चमू तसेच सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी व रोपवाटिका संबंधित वनरक्षक उपस्थित होते.

