HomeNewsनागपुर डिवीजन

आठवडी बाजारपेठेत दुकान थाटणाऱ्याना कंत्राटदाराकडून असभ्य वागणूक, नियमाच्या दुपट पैसे वसुल करीत असल्याचा नागरिकांचा आरोप – कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

गडचांदुर (संतोष पटकोटवार) गौतम नगरी चौफेर (अन्याय तिथे आपण) – चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी समजल्या जाणारी गडचांदुर नगर परिषद होय,, येथे तीन सिमेंट कंपन्यांचा संगम असल्याने खेड्यापाड्यातून व शहरी विभागातून आपला पारंपरिक व्यवसाय करण्याकरिता नागरीक आठवडी बाजारात प्रत्येक मंगळवारला येतात व आपली उपजीविका करतात, आठवडी बाजार पेठेत दुकान थाटणाऱ्या प्रत्येक दुकानदारांकडून कंत्राटदाराने किती पैसे घ्यायचे हे नगर परिषदेने आधीच ठरवून दिलेले असते, ठरवून दिलेल्या धारबंदीनुसार कंत्राटदाराने दुकानदारांकडून पैसे घ्यायला पाहिजेत परंतु नगर परिषदेने ठरवून दिलेल्या धाराबंदीच्या दुप्पट दाम वसूल करीत असून नियमाची पायमल्ली होत असल्याचा आरोप किरकोड दुकानदारांकडून होत आहे, पैसे न दिल्यास असभ्य वागणूक देत दमदाटी करीत असल्याचा आरोप सुद्धा दुकानदारांकडून होत असुन वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळुन काही दुकानदारांनी नगर परिषदेच्या अध्यक्ष व मुख्य अधिकारी यांचेकडे धाव घेऊन तक्रार दाखल करण्यात आली असुन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आठवडी बाजारपेठेत दुकान लावणाऱ्या दुकानदारानी केली आहे, बाहेर गावातून आठवडी बाजारात येणाऱ्या कोणत्याही दुकानदारावर कंत्राटदाराने नियमापेक्षा जास्त पैसे घेऊन शांतता भंग करू नये याकडे नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी विनंती सुद्धा दुकानदारांकडून करण्यात येत आहे

You cannot copy content of this page