गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.३१ जुलै सनराईज इंग्लिश स्कूल, राजुरा येथे विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्म, संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘वारी – पर्यावरण वाचवा’ हा विशेष उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला.
वारी आपल्याला अनेक चांगले संस्कार शिकवते—शिस्त, सहकार्य, समानता, सेवा आणि स्वच्छता. जसे वारकरी मार्ग स्वच्छ ठेवतात, तसेच आपणही आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे.
“मी माझा परिसर स्वच्छ ठेवीन, पाण्याची बचत करीन, झाडे लावीन, प्लास्टिकचा वापर कमी करीन आणि पर्यावरणाचे संरक्षण करीन.” या प्रार्थनेने वारीची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पूजनाने झाली. प्रमुख पाहुणे किशोर हिंगाने नगरसेवक राजुरा व अॅड. मनोज काकडे सर यांनी अध्यात्म, संत परंपरा आणि पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत टाळ-मृदुंगाच्या गजरात वारीचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. “पर्यावरण वाचवा” हा संदेश देत विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन, स्वच्छता आणि निसर्ग संरक्षणाची शपथ घेतली. या कार्यक्रमाला पालकांचीही उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांचे सादरीकरण पाहून पालकांनी त्यांचे कौतुक केले तसेच शाळेच्या पर्यावरण जनजागृती तेही संस्कृतीच्या माध्यमाने या संकल्पनेचे स्वागत केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडन्याचे श्रेय शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा आमटे यांनी शाळेचे सल्लागार सदस्य संदीप मालेकर आणि जयश्री मालेकर , विधाता फाउंडेशनच्या अध्यक्षा शुभांगी धोटे , सचिव अॅड. मनोज काकडे यांना दिले.
तसेच उत्कृष्ट रित्या संकल्पना प्रदर्शनाचे श्रेय शिक्षकवृंद करिश्मा लांडे, आस्मीन क़ुरेशि, कांचन यादनुर्वर, मोनिका चव्हाण,प्रिती सिंग, आलीशा सय्यद, निखत शेख, प्रणाली डांगे व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना दिले. अध्यात्म आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम घडविणारा हा उपक्रम सर्वांच्या स्मरणात राहणारा ठरला.



