गौतम नगरी चौफेर (गडचांदूर) – विदर्भ बूरूड समाजाची आमसभा यवतमाळ येथील भावे मंगल कार्यालय येथे पार पडली असुन सर्व प्रथम केतेश्वर महाराज यांच्या प्रतीमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सूरूवात करण्यात आली, सर्व प्रमुख पाहुण्यांचे पुष्पमाला शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले, सर्व नवनिर्वाचित पदाधिका-यांचे बायलट पेपर द्वारे निवडणूक घेण्यात आली यात अध्यक्ष पदासाठी विविध शहरातुन पाच ऊमेदवार रिंगणात ऊभे होते यात: श्री प्रभाकर पटकोटवार, श्री विनायक चिलविरवार, श्री गजाजन दर्शनवार श्री ईश्वर चर्लेवार इत्यादि ऊमेदवार रिंगणात ऊभे होते, त्यापैकी ऍड, ईश्वर चर्लेवार यांना सर्वाधिक मते मिळाल्याने श्री ईश्वर चर्लेवार यांची विदर्भ बूरूड समाजाच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली व महासचिवपदी श्री. विवेक मारोतराव चिलवरवार नागपूर यांची निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्ष (नागपूर विभाग): श्री. सुरेश गंगारामजी पुट्टेवार चंद्रपुर उपाध्यक्ष (अमरावती विभाग): श्री. रमाकांत सुलभेवार यवतमाळ संघटन सचिव (नागपूर विभाग): सौ. दिपांजली मंथनवार (गढचांदुर) संघटन सचिव (अमरावती विभाग): श्री. निलेश कनकेरवार महिला सचिव: सौ. अनुराधा पल्लडवार कार्यालयीन सचिव: श्री. राजेश शंग्रपवार सचिव (नागपूर प्रदेश): सौ. स्वाती वडपल्लीवार
सचिव (अमरावती विभाग): श्री. राहुल मोहतेवार अंकेक्षक: श्री. संजय मांजरे
युवा सचिव: श्री. मोहित मादेवार यांची निवड करण्यात आली “निवडणूक प्रक्रिया सकाळी दहा वाजता पासून सायंकाळी सात वाजे पर्यन्त सुरू होती,यवतमाळ बुरूड समाजाच्या वतीने आलेल्या सर्व पाहुण्यांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली, प्रमुख उपस्थिति विदर्भ बूरूड समाजाचचे माजी महासचिव श्री बंडुजी गैनेवार, हरीशजी दिकोंडवार, मधूकरराव गैनेवार, मारोतराव सूलभेवार, विनायकराव चिलविरवार प्रभाकरजी पटकोटवार, अशोकराव नागापुरे व ईतर जिल्यातून आलेले महीला पूरूष मोठ्या संखेने उपस्थिति होते


