माजी मुख्यमंत्री चव्हाण साहेब सोबत ग्रेट भेट

HomeNewsनागपुर डिवीजन

माजी मुख्यमंत्री चव्हाण साहेब सोबत ग्रेट भेट

aगौतम नागरी चौफेर (शिला धोटे ) महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.पृथ्वीराज चव्हाण साहेब यांची काल ७/३/२०२६ रोजी मुंबईत विधानभवनात भेट घेतली.
    कांग्रेस चे जेष्ठ नेते,ज्यांनी अद्याप पर्यंत कोणतेही चुकीचे काम केले नाही.मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असूनही त्यांचेवर कोणीही दोष देऊ शकले नाही.असा निष्कलंक माणूस राजकारणात विरळाच.किमान माझ्या महाराष्ट्र राज्यात तरी दुर्मिळ आहेत.
     आजची कांग्रेस दिल्लीतील पार्लमेंट मधे चांगले काम करीत आहे.पण महाराष्ट्रात मात्र वैचारिक मरगळ आली आहे.जनसंपर्क तुटलेला आहे.त्यामुळे सांगावे लागते,मी कांग्रेस पक्षाचा अमुक अमुक आहे.तरीही लोकांचा विश्वास बसत नाही.बैनर वरील फोटो खाली पद लिहूनही लोकांना खरे वाटत नाही.याची कारणे आणि उपाय या विषयावर आम्ही वीस मिनिटे चर्चा केली.
    वैचारिक जनजागृती साठी महाराष्ट्रातील बुद्धिमान, उच्चशिक्षित, ज्ञानी आणि प्रामाणिक समाजसेवक आज जी भुमिका घेत आहेत त्याचा उपयोग कांग्रेस ने करून घेतला पाहिजे.किमान कांग्रेस विषयी , कांग्रेस च्या धोरणांविषयी,कार्याविषयी माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहचवता येईल.आज महाराष्ट्र कांग्रेस मुकी बहिरी झाली आहे.नेते दिव्यांग झालेले वाटतात.म्हणून महाराष्ट्र राजकारणात फक्त बॉल किपर ची भुमिका करीत आहे.राजकारणात हे पुरेसे नाही.
     दुसरा विषय चर्चेला घेतला,तो प्रत्यक्ष जमीनीवर जनतेला मदत करणे.त्यांच्या प्रशासकीय समस्या सोडवणे.मागील दहा वर्षांत माझ्या जळगाव जिल्ह्यातील कोणतीही कांग्रेस नेता किंवा पदाधिकारी जनतेच्या मदतीला आला नाही.माझ्याकडे पहा आणि मस्त राहा,या भुमिकेत आहेत.जनतेला हे आवडत नाही.
     महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी, अतिवृष्टीची नुकसानभरपाई,शेत रस्ता,शेत मोजणी, पुनर्वसन हे ज्वलंत प्रश्न सतावत आहेत.या साठी कांग्रेस ने जमीनीवर उतरून काम केले पाहिजे.शासकिय आणि प्रशासकीय कामाचा अनुभव येथे वापरला पाहिजे.फक्त मिशांना तूप लावून फोटो काढणे,मिरवणे पुरेसे नाही.गांधी नेहरू यांची पुण्याईचा लोकांना विसर पडलेला आहे.गांधीजी ,नेहरू, पटेल,शास्त्रीजी ,इंदिराजी यांच्या धोरणांची ,कामाची पुनरावृत्ती करणे आवश्यक आहे.येथे खंड पडलेला आहे.प्रदेश अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, जिल्हा अध्यक्ष,शहर अध्यक्ष ही पदे संस्थानिक सारखी फक्त शोभेची वाटतात.
      कांग्रेसचे आमदार खासदार मंत्री यांनी शिक्षण संस्था, दवाखाना, पेट्रोल पंप, पतपेढी यात आर्थिक घोटाळा केल्यामुळेच ते भाजप सरकार ला दचकून वचकून आहेत.जेलमधे जाण्याच्या भीतीने पदाला शोभेल अशी राजकीय भुमिका घेत नाहीत.अनेक आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री सुद्धा भाजप मधे  गेले ते याच कारणामुळे.ते गेल्यानंतर विधवेचे रडणे बंद करून मर्दाचे लढणे सुरू केले पाहिजे.तरच कांग्रेस चे राजकीय अस्तित्व टिकून राहिल.यासाठी बुद्धिमान उच्चशिक्षित ज्ञानी प्रामाणिक आणि कफल्लक समाजसेवकांना कांग्रेस ने फ्रंट वर ठेवले पाहिजे.तेच लढू शकतात.संस्थानिकांना सेकंड वर ठेवले पाहिजे.असे संस्थानिक भाजप ला घाबरतात.ही अवस्था बदलली पाहिजे.
     कांग्रेस आणि भाजप हेच पक्ष ध्येय ,धोरण असलेले आहेत.पैकी कांग्रेस सत्तेपासून दिर्घकाळ दूर फेकली गेली तर भारतीय लोकशाहीचा तोल जाऊ शकतो. प्रादेशिक पक्ष हा तोल सांभाळू शकत नाही.इराण,इराक, अफगाणिस्तान,चीन, रशिया,कोरीया सारखी एकपक्षीय राज व्यवस्था बनू शकते.हा धोक्याचा इशारा आहे.
     या चर्चेनंतर चव्हाण साहेब म्हणाले, तुम्ही काम चालू ठेवा.मी सहकार्य करीन.

… शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

COMMENTS

You cannot copy content of this page