गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – दिनांक 8 मे 2026 ला छत्रपती शिवाजी महाराज महा स्वराज्य समाधान शिबिराचे आयोजन महसूल मंडळ पवनी तर्फे गांधी भवन पवनी येथे करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात महसूल विभागातर्फे पुरवल्या जाणाऱ्या सर्व योजनेचे स्टॉल लावण्यात आले होते. त्यामध्ये ऑनलाईन सातबारा ,फेरफार संजय गांधी निराधार योजना, वर्ग दोनशे वर्ग करणे उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, जिवंत सातबारा टप्पा एक, ॲग्री स्टॅक पीएम किसान नोंदणी इत्यादी वाटप करण्यात आले, घरांसाठी पट्टे वाटप ई मोजणी अर्ज. इत्यादी योजना दाखले पुरवण्यात आले. तसेच नगरपरिषद पवनी, आरोग्य विभाग पवनी, भूमि अभिलेख विभाग पवणी सब रजिस्टर ऑफिस पवनी चे प्रतिनिधी उपस्थित होते सदर समाधान शिबिराचे उद्घाटन अध्यक्ष किशोर राऊत यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ विजयाताई नंदुरकर नगराध्यक्षा पवनी ह्या उपस्थित होत्या. तसेच निवडणूक नायब तहसीलदार शुभदा धुर्वे, उपनगराध्यक्ष सोनू बावनकर, संदीप नंदरधने बीजेपी शहर अध्यक्ष उपस्थित होते. कार्यक्रमा मध्ये एकूण 610 लोकांचे दाखले वाटप, व इतर कामे करण्यात आली, रक्तदान शिबिराचे आयोजन समर्पण ब्लड बँक भंडारा संचालक नखाते यांच्यातर्फे करण्यात आले होते .त्यामध्ये 13 लोकांचे रक्तदान करण्यात आले, व 58 लोकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन नत्थू शेंडे मंडळ अधिकारी यांनी केले, प्रास्ताविक किशोर राऊत नायब तहसीलदार पवनी यांनी केले, आभारपरदर्शन पुष्पम लिमजे यांनी मानले.आयोजन मंडळ अधिकारी मसराम, तलाठी सव्वालाखे व मंडळ पवणी येथील तलाठी यांनी केले



COMMENTS