दिगंबर देशभ्रतार “गौतम नगरी चौफेर” तुमसर/नाकाडोंगरी :- तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील लोभी च्या जंगलातील एका झाडाला कुजलेल्या अवस्थेत गळफास स्थितीत शव मिळाल्याने आज 30 मार्च ला परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृतकाचे नाव राजकुमार लेखु नेवारे वय 38 राहणार आष्टी येथील असुन हा 15 दिवसापासुन लापता असल्याची चर्चा सुरु आहे. शव कुजलेल्या अवस्थेत असुन दुर्गंधी पसरली आहे.त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण झाले असून जन चर्चेत शंका-कुशंका वर्तवल्या जात आहे.


COMMENTS