पोलिसांची दडपशाही- वंचितचे जिल्हा महासचिव डी जी रंगारी, जिल्हा महिला अध्यक्षा तनुजा नागदेवे यांना अटक

HomeNewsनागपुर डिवीजन

पोलिसांची दडपशाही- वंचितचे जिल्हा महासचिव डी जी रंगारी, जिल्हा महिला अध्यक्षा तनुजा नागदेवे यांना अटक

– 3  तासानंतर सुटका
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – नागपूर येथे आरएसएसच्या मुख्यालयावर वंचित बहुजन आघाडीचे एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार आहे. पंतप्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणी करिता मोर्चा होता पंतप्रधानाचे नाव एफस्टीन फाईल व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव मलिन झाले आहे .त्यामुळे राजीनामा द्यावा हा मोर्चाचा उद्देश होता आज दिनांक 23 मार्च रोजी सकाळी साकोली येथून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव डी जी रंगारी सकाळी फिरायला गेले होते .जर्सीवरच असताना पोलीस विभागाचे 5 कर्मचारी त्यांच्या घरी आले . तेवढ्यात काही कार्यकर्त्यांना मी फोन केला होता कशासाठी तुम्ही आम्हाला  अटक करता त्यांनी सांगितलं  वरून आदेश आहे त्यानंतर मी त्यांना म्हटलं मी अजून तोंड धुवायला आंघोळ करायला आहे कपडे सुद्धा बदलायला आहे नंतर त्यांनी कपडे वगैरे बदलून गाडीत बसून घेऊन गेले व त्यानंतर जिल्हा महिला अध्यक्ष तनुजा नागदेवे यांच्या घरी सकाळी 7 वाजता पोलीस विभागाचे कर्मचारी त्यांना अटक करण्याकरता आले व त्यांना त्यांना विचारले असता की आम्हाला वरून आदेश आहे म्हणून आम्ही तुम्हाला या ठिकाणी ताब्यात घेण्याकरता आलो असं सांगितलं तसेच साकोली तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी यांना सुधा बोळदे  गावी जाऊन पोलीस वाल्यांनी अटक केली
अशा पद्धतीने प्रकार वंचित बहुजन आघाडी खपवून घेणार नाही 3 तासानंतर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले.

COMMENTS

You cannot copy content of this page