– नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या बालसंघटिका दुर्वा बेले यांचा वाढदिवस साजरा.
गौतम नगरी चौफेर राजुरा २३ मार्च – वयाच्या तिसऱ्या वर्षापासून शाळेत दाखल झाल्यानंतर सातत्याने वयानुरूप वाढदिवस साजरा करतांना शाळा, विद्यार्थी, पर्यावरण, मानवता विकास अशा उपक्रमांना डोळ्यासमोर ठेवून दुर्वा बेले हिचा वाढदिवस साजरा केला जातो. यावर्षी इयत्ता आठवीत शिकणाऱ्या दुर्वा च्या वाढदिवसा निमित्याने इन्फंट जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा या शाळेला तेरा विविध प्रजातीचे फुलझाड भेट देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी भेट देण्यात आलेल्या फुलझाडांत बोगनवेल, जास्वंद, गुलाब, एरिका पाम, क्लांचू आदींचा समावेश होतो. यावेळी इन्फंट शाळेच्या सिबिएसईच्या मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, स्टेट च्या मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अंन्सारी, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र देशकर, राज्य युवा उपाध्यक्ष रवी बुटले, श्रीरंग ढोबळे, आदर्श शाळेच्या मुख्याध्यापिका तथा राजुरा तालुका महिला संघटिका नलिनी पिंगे, सुवर्णा बेले, ओवी बेले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यापूर्वी दुर्वाने शाळेतील ग्रंथालयाला पुस्तके भेट दिली, आशादेवी शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची बॉटल दिल्या, वृक्ष, कुंड्या, वृक्षारोपण, गरजूंना मदत आदीं उपक्रम राबविण्यात आले. मानवता व निसर्ग सेवा हीच खरी ईश्वर सेवा असून यातून मिळणारा आनंद हा अविस्मरणीय क्षण ठरतो असे मत दुर्वाच्या आई वडिलांनी व्यक्त केले आहे.


COMMENTS