प्रा. मनोहर धोंडे सर यांची राज्यसभा किंवा विधानपरिषदेवर नियुक्ती करा

HomeNewsनागपुर डिवीजन

प्रा. मनोहर धोंडे सर यांची राज्यसभा किंवा विधानपरिषदेवर नियुक्ती करा

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, भंडारा जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे, प्रभारी डॉ. अक्षय कहालकर यांची मागणी
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा : ओबीसी व बहुजन समाजाच्या आरक्षण विषयी व बोगस ओबीसी आरक्षण जीआर विरोधात मुंबई उच्च न्यायालयात पहिली याचिका दाखल करणारे व त्या खोट्या जीआरला रद्द करण्यात यावे असे आव्हान देत मुंबई आझाद मैदान व नागपूर येथे मोर्चाचे नेतृत्व करणारे अभ्यासू आणि वीरशैव लिंगायत शिवा संघटना राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे सर यांची राज्यसभा किंवा विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यात यावी. अशी मागणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे, प्रभारी डॉ. अक्षय कहालकर यांनी पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यातून ही मागणी उचलली आहे.
          भारतीय राज्यघटनेनुसार राज्यसभा किंवा विधानपरिषदेसाठी अशा व्यक्तींना संधी दिली जाते ज्यांनी सामाजिक कार्य, शिक्षण, विचार नेतृत्व व जनहिताच्या क्षेत्रात उल्लेखनीय, निस्वार्थ व दीर्घकालीन योगदान दिले आहे. त्या अनुषंगाने शिवा संघटना व महाराष्ट्रासह देशातील तमाम वीरशैव – लिंगायत, ओबीसी, बहुजन, दलित, आदिवासी व सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने मागणी केली की, प्रा. मनोहरजी धोंडे यांची राज्यसभा  किंवा विधानपरिषद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात यावी. कारण प्रा. मनोहर धोंडे सर हे शासनमान्य, लोकमान्य व राष्ट्रमान्य कार्याबद्दल शासनस्तरावर सन्मानित कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा “महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार” त्यांच्या निस्वार्थ सामाजिक कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य शासनाने प्रदान केला आहे. शैक्षणिक व बौद्धिक योगदान गोल्ड मेडलिस्ट, आदर्श प्राध्यापक
विद्यार्थी चळवळीपासून सामाजिक नेतृत्व शिक्षणातून समाज परिवर्तन,४० वर्षांचे निस्वार्थ सामाजिक कार्य चार दशकांची अखंड सेवा कोणतेही पद नसताना प्रभावी कार्य सर्व घटकांसाठी न्यायाचा लढा, भव्य संघटन उभारणीत शिवा संघटनेच्या देशभर ५ हजार पेक्षा अधिक शाखा स्थापन, लाखो समाज बांधवांना एकत्रित करून सामाजिक शक्ती निर्माण व संघटन, जनजागृती आणि सामाजिक परिवर्तनाचा प्रभावी विस्तार, ऐतिहासिक व धोरणात्मक कामगिरी, महाराष्ट्रात २५ जातींना आरक्षण मिळवून देण्यात योगदान, केंद्रस्तरावर अंतिम टप्प्यात पाठपुरावा, विविध समाजघटकांच्या न्यायासाठी यशस्वी लढे, महात्मा बसवेश्वर विचारांचा प्रसार, त्यांच्या जयंतीला शासकीय मान्यता मिळवून देण्यात निर्णायक भूमिका, शालेय अभ्यासक्रमात समावेश, समता, बंधुता व लोकशाही मूल्यांचा प्रसार, राष्ट्रीय स्तरावरील योगदान संसद भवनात महात्मा बसवेश्वर पुतळा व अनुभव मंटप यामध्ये विशेष योगदान राहिले आहे.

नुकतेच दिल्लीत राष्ट्रपती महोदया, पंतप्रधान, गृहमंत्री, मा. राज्यपाल महाराष्ट्र, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना विविध संघटना वतीने प्रचंड स्वाक्षऱ्यांसह निवेदन सादर करण्यात आले आहे. याच अनुषंगाने महाराष्ट्र शासन मान्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी सुद्धा या मागणीला दुजोरा दिला. तातडीने त्यांनी भंडारा जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे व प्रभारी डॉ. अक्षय कहालकर यांना सुचना देत सदर मागणीवर जाहीर समर्थन करीत. कार्यसम्राट लिंगायत वीरशैव पुढारी प्रा. मनोहर धोंडे सर यांना राज्यसभेवर किंवा विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यात यावी अशी पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यातून ही मागणी केली आहे. लवकरच जिल्हा स्तरावरून मा. राष्ट्रपती महोदय, प्रधानमंत्री, महाराष्ट्र राज्यपाल यांना महाराष्ट्र शासन मान्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ वतीने निवेदन सादर केले जाईल अशी माहिती जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे यांनी दिली आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page