अवैध वाळू उपसामुळे पाण्याची भीषण टंचाईचे संकट घोंगावणार?

HomeNewsनागपुर डिवीजन

अवैध वाळू उपसामुळे पाण्याची भीषण टंचाईचे संकट घोंगावणार?

(👉लाखो रूपयांचा महसूल खड्यात👈 )
‘आता तरी प्रशासनाचे डोळे उघडणार का?
की नदी वाळवंट झाल्यावरच अधिकारी जागे होणार?’
गौतम नगरी चौफेर (कोरपना) तेलंगणा – महाराष्ट्र सीमेलगत व चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या कोरपना तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा आणि वर्धा या नद्या परिसरातील गावांसाठी जीवनवाहिनी ठरल्या आहेत. या नद्यांच्या पाण्यावर अनेक गावांचे पिण्याचे पाणी, शेती तसेच काही सिमेंट उद्योग अवलंबून आहेत.

मात्र गेल्या काही महिन्यांपासून या नद्यांच्या पात्रात मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा सुरू असल्याने पर्यावरण आणि पाणी व्यवस्थेवर गंभीर संकट निर्माण होत असल्याचे चित्र आहे. वृत्तपत्रांमध्ये वारंवार पुराव्यांसह बातम्या प्रसिद्ध होऊनही महसूल प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

तालुक्यातील परसोडा, अकोला, झोटिंग, वनोजा, सोनुर्ली, सांगोडा, भोयगाव, तामसी, मारडा, कुर्ली, पिपरी आणि घटाट या परिसरातील नदीपात्रातून नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. नदीचे पात्र अक्षरशः धार बंध ओरबाडले जात असताना संबंधित येथिल अधिकारी मात्र निष्क्रिय असल्याची टीका अनेक नागरिकांकडून होत आहे.


(अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
गेल्या दोन महिन्यांत हजारो ब्रास रेती चोरी होत असताना संबंधित यंत्रणा मात्र निष्क्रिय राहिल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे या अवैध रेती उपशाला आश्रय देणाऱ्या संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी जोर धरत आहे. ‘वारंवार बातम्या प्रसिद्ध होऊनही कारवाई होत नसेल, तर प्रशासनाने’ रेती चोरांना मोकळे रान’ असल्याचे जाहीर करावे का?’ असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.)

COMMENTS

You cannot copy content of this page